Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कामेश कांबळेला योग्यवेळी सन्मानपूर्वक संधी देणार, कार्यकर्त्यांनी नाराज होऊ नये; शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आवाहन

कामेशचे समर्थक, सहकारी, कार्यकर्ते यांनी नाराज, हवालदिल होऊ नये, कसलीही काळजी करू नये, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 05, 2026 | 04:17 PM
कामेश कांबळेला योग्यवेळी सन्मानपूर्वक संधी देणार, कार्यकर्त्यांनी नाराज होऊ नये; शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आवाहन

कामेश कांबळेला योग्यवेळी सन्मानपूर्वक संधी देणार, कार्यकर्त्यांनी नाराज होऊ नये; शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आवाहन

Follow Us
Follow Us:

सातारा : कामेश कांबळे हा वयाने लहान असला तरी तो मूळचा भाऊसाहेब महाराजांच्या विचारांचा कार्यकर्ता आहे. त्यांच्या पश्चात तो माझ्यासोबत समाजकारणात सक्रिय राहिला आहे. माझ्या कार्यकर्त्याला हरप्रकारे ताकद देण्याचे काम मी नेहमीच केले असून, काहीही झाले तरी मी माझ्या कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देत नाही. राजकारणात काही वेळेला पेच निर्माण होतो त्यावेळी काही निर्णय मागे घ्यावे लागतात. कामेशला यावेळी जिल्हा परिषद सभापती पदावर पोहचवता आले नाही, मात्र कामेशला योग्य वेळी सन्मानपूर्वक योग्य संधी दिली जाईल, असा शब्द एक आमदार म्हणून देत आहे, त्यामुळे कामेशचे समर्थक, सहकारी, कार्यकर्ते यांनी नाराज, हवालदिल होऊ नये, कसलीही काळजी करू नये, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.

 

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी म्हटले आहे की, स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या विचाराने प्रेरित होऊन कामेश कांबळे याने तरुण वयात समाजकारण चालू केले. भाऊसाहेब महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना त्याने चांगली तरुण फळी उभी करून चांगल्या विचाराने काम केले. युवा पिढीच्या माध्यमातून त्याने समाजकारण करताना जनहित जपण्याचे काम केलं आहे. नुकत्याच झालेल्या सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत त्याने भाजपकडून उमेदवारी मागितली होती. त्याला उमेदवारी मिळावी यासाठी मी प्रयत्न केले होते. तथापि काही अडचणीमुळे त्याला भाजपची उमेदवारी मिळाली नाही. समाजकारण चालू राहावे यासाठी त्याने राष्ट्रवादी पक्षातून निवडणूक लढवली. कामेश हा कालही माझ्या विचारांचा होता आणि आजही माझ्याच विचारांचा आहे, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी त्याने जी भूमिका बजावली आहे याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे. याशिवाय संपूर्ण जिल्ह्याने, भारतीय जनता पार्टी आणि पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनीही याची दखल घेतली आहे.

जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती निवडीमध्ये सुद्धा कामेशला योग्य संधी मिळावी असे निर्णय झाले होते. वरिष्ठांनी काही निर्णय दिले होते. निवडणूक किंवा राजकारणात काही वेळेला समोर पेच निर्माण झाला असेल त्यावेळी काही निर्णय मागे घ्यावे लागतात. यावेळी कामेशला सभापती पदावर पोहचवता आले नाही पण, त्याच्यावर कोणताही अन्याय होणार नाही, एक आमदार, लोकप्रतिनिधी आणि मंत्री म्हणून मी कामेश, त्याचे सर्व सहकारी, सर्व समर्थक आणि सर्व कार्यकर्त्यांच्या कायम पाठीशी उभा आहे. माझ्या कार्यकर्त्यावर मी कधीच अन्याय होऊ देत नाही. कामेशला ताकद देणे ही माझी भूमिका आहे. यावेळी नाही जमलं पण, योग्य वेळी योग्य संधी देऊन कामेशचा सन्मान निश्चितच करू, असा शब्द मी कामेश, त्याचे सर्व सहकारी, समर्थक आणि कार्यकर्त्यांना देत आहे. त्यामुळे कोणीही नाराज, हवालदिल होऊ नये, कामेशच्या बाबतीत कसलीही काळजी करू नये, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा : झेडपीत मंगळवारी रंगणार ‘हायव्होल्टेज’ ड्रामा; समिती सदस्य निवडीसाठी राजकीय फिल्डिंग जोरात

Web Title: Shivendrasinhraje bhosale has made an important appeal to bjp workers in satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 04:17 PM

Topics:  

  • Satara News
  • Shivendra Raje
  • ZP Politics

संबंधित बातम्या

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण
1

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण

‘वसंतराव मानकुमरे यांचे प्रसिद्धीसाठी चुकीचे वक्तव्य’; श्रीहरी गोळे यांची माहिती
2

‘वसंतराव मानकुमरे यांचे प्रसिद्धीसाठी चुकीचे वक्तव्य’; श्रीहरी गोळे यांची माहिती

‘तुम्ही दोन हात केले तर आम्हीही चार हात करू’; भाजपचा शशिकांत शिंदेंवर हल्लाबोल
3

‘तुम्ही दोन हात केले तर आम्हीही चार हात करू’; भाजपचा शशिकांत शिंदेंवर हल्लाबोल

Satara News: साताऱ्याला आधुनिक विकासाची जोड देणार! स्वातंत्र्यदिनी नगराध्यक्ष अमोल मोहितेंचे नागरिकांना  आवाहन
4

Satara News: साताऱ्याला आधुनिक विकासाची जोड देणार! स्वातंत्र्यदिनी नगराध्यक्ष अमोल मोहितेंचे नागरिकांना आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.