Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: धंगेकरांचा नवीन बॉम्ब! पुण्यातील आणखी एक जैन हॉस्टेल घोटाळा उघड; म्हणाले, “एखाद्या टोळीच्या…”

पूर्वीच्या एच.एन.डी. जैन बोर्डिंगच्या जागा विक्रीप्रकरणातही मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी धर्मादाय आयुक्तांनी व्यवहारावर स्थगिती दिली होती. मात्र, अद्यापही संबंधितांवर गुन्हे दाखल झालेले नाहीत.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 03, 2025 | 07:37 PM
Pune News: धंगेकरांचा नवीन बॉम्ब! पुण्यातील आणखी एक जैन हॉस्टेल घोटाळा उघड; म्हणाले, “एखाद्या टोळीच्या…”
Follow Us
Close
Follow Us:

आणखी एका जैन हॉस्टेलचा गैरव्यवहार समोर- धंगेकर 
जीवप्रभा ट्रस्टच्या भूखंड विक्रीबाबत रविंद्र धंगेकरांचा गंभीर आरोप
३ हजार ७०० चौरस फूट जमीन विक्रीसाठी काढण्यात आल्याचा  गंभीर आरोप

पुणे: शहरातील जैन धर्मीय समाजाच्या हॉस्टेलच्या जमिनींवर गैरव्यवहारांचे प्रकरण थांबण्याचे नाव घेत नाही. मॉडेल कॉलनीतील प्रसिद्ध ‘एच.एन.डी. जैन बोर्डिंग’च्या  भूखंड विक्री व्यवहारावरून आधीच खळबळ माजलेली असतानाच, आता आणखी एक नवे प्रकरण समोर आले आहे. औंध येथील जीवप्रभा चॅरिटेबल ट्रस्टच्या मालकीची तब्बल ३३ हजार ७०० चौरस फूट जमीन विक्रीसाठी काढण्यात आली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे.

धंगेकर यांनी सोमवारी सोशल मीडियावरून यासंदर्भात माहिती देत, “पुण्यात पुन्हा एक जैन हॉस्टेल घोटाळा उघड झाला आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला. त्यांनी सांगितले की, जीवप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट या सार्वजनिक ट्रस्टने धर्मादाय आयुक्त कार्यालयात सेक्शन ३६ अंतर्गत विक्रीसाठी अर्ज दाखल केला आहे. या प्रस्तावामध्ये ट्रस्टच्या काही विश्वस्तांचा सहभाग असून, त्यात एच.एन.डी. जैन बोर्डिंगचा विश्वस्त चकोर गांधी याचेही नाव विशेषत्वाने घेतले जात आहे.

धंगेकर यांनी प्रश्न उपस्थित केला की, “हा प्रकार एखाद्या टोळीच्या कारभारासारखा तर नाही ना? ट्रस्टच्या भूखंड विक्रीच्या माध्यमातून काही मंडळींनी पुन्हा एकदा समाजाच्या मालमत्तेवर डल्ला मारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे का?” त्यांनी या व्यवहारामागे राजकीय हस्तक्षेप असल्याचाही संशय व्यक्त केला आहे.

आणखी एका जैन हॉस्टेलचा गैरव्यवहार समोर…! पुण्यातील औंध येथील जीवप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट (पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट) यांच्या मालकीची 33,700 चौरस फुटांची जागा विक्रीसाठी ट्रस्टींनी प्रस्तावित केली आहे. या विक्रीसाठी ट्रस्टच्या ट्रस्टींनी सेक्शन 36 अंतर्गत पुणे येथील चॅरिटी कमिशनर… — Ravindra Dhangekar Official (@DhangekarRavii) November 1, 2025
पूर्वीच्या एच.एन.डी. जैन बोर्डिंगच्या जागा विक्रीप्रकरणातही मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी धर्मादाय आयुक्तांनी व्यवहारावर स्थगिती दिली होती. मात्र, अद्यापही संबंधितांवर गुन्हे दाखल झालेले नाहीत, याबाबत धंगेकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. “जर या प्रकरणात दोषींवर कारवाई झाली नाही, तर ट्रस्टच्या भूखंड विक्रीचा धंदा पुढेही सुरूच राहील,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या नव्या प्रकरणामुळे जैन समाजात तसेच पुणे शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. धार्मिक आणि शैक्षणिक उद्देशासाठी देणगीदारांनी उभारलेल्या ट्रस्टच्या मालमत्ता, भूखंड हे काही मोजक्या व्यक्तींच्या फायद्यासाठी विक्रीसाठी काढल्या जात असल्याची चर्चा समाजात रंगली आहे. आता या प्रकरणात धर्मादाय आयुक्त काय भूमिका घेतात आणि प्रशासन पुढे काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Shivsena leader ravindra dhangekar allegations aundh jivprabha charitable trust jain hostel pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 07:37 PM

Topics:  

  • Pune
  • pune news
  • Ravindra Dhangekar

संबंधित बातम्या

Railway Ticket Booking: आता तिकीटासाठी रांगेत नाही तर ‘या’ ठिकाणी जा! रेल्वेने सुरू केली नवी सुविधा
1

Railway Ticket Booking: आता तिकीटासाठी रांगेत नाही तर ‘या’ ठिकाणी जा! रेल्वेने सुरू केली नवी सुविधा

Asim Sarode : असीम सरोदेंची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचा निर्णय
2

Asim Sarode : असीम सरोदेंची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचा निर्णय

Pune Municipal Voter List : मतदार यादीवर अदृश्य हात कोणाचा? हेराफेरी केल्याचे आरोप
3

Pune Municipal Voter List : मतदार यादीवर अदृश्य हात कोणाचा? हेराफेरी केल्याचे आरोप

Pune News: शिरुरमध्ये बिटाट्याचा धुमाकूळ; हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू, गावकऱ्यांचा आक्रमक पवित्रा
4

Pune News: शिरुरमध्ये बिटाट्याचा धुमाकूळ; हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू, गावकऱ्यांचा आक्रमक पवित्रा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.