Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, राज्यात मोठे भगदाड
ठाणे: दोन वर्षांपूर्वी शिवसेनेट फुट पडली. एकनाथ शिंदे आणि 50 आमदार भाजपसोबत महायुतीमध्ये सामील झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नारवेकर यांनी पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. त्यानंतर लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने एकनाथ शिंदे यांच्यावर जास्त विश्वास दर्शवला असल्याचे पाहायला मिळाले. मात्र शिवसेना फूटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती अजूनही थांबताना दिसत नाहीये. कारण राज्याच्या विविध भागातील ठाकरेंच्या पदाधीकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. ठाण्याच्या आनंद आश्रमात ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवनेतील गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या ठाणे, भिवंडी, शहापूर, पालघर आणि छत्रपती संभाजीनगरच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान या पक्षप्रवेशानंतर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमधून पदाधिकारी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. विधानसभेत शिवसेनेचे 60 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे खरी शिवसेना कोणती आहे त्यावर जनतेने शिक्कामोर्तब केले आहे. आता मी उपमुख्यमंत्री आहे. आता स्थानिक पातळीवर भगवा फडकवायचा आहे. मला अनेक शिव्या, श्राप दिल्या. पण कामातून उत्तर दिले.
एकनाथ शिंदे ‘धनु्ष्यबाण’ उद्धव ठाकरेंना परत देणार?
नागपूर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खातेवाटपाच्या नाट्यमय घडामोडींवर सस्पेंस संपला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील बहुप्रतिक्षित विभागांचे खातेवाटप जाहीर करण्यात आले. मंत्रिमंडळ विस्तारानंतर जवळपास आठवडाभर चाललेल्या चढाओढीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी रात्री उशिरा खातेवाटपांची घोषणा केली. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थखात्याची जबाबदारी देण्यात आली. पण सर्व प्रयत्न करूनही उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना गृहखाते मिळाले नाही.
हेही वाचा: Eknath Shinde News: एकनाथ शिंदे ‘धनु्ष्यबाण’ उद्धव ठाकरेंना परत देणार? नेमकं काय आहे कारण?
नगरविकास खात्यावर समाधान
मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने एकनाथ शिंदे यांना किमान गृहखाते दिले जाईल, अशी आशा होती. मात्र तसे न झाल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी गृहखाते स्वत:कडे ठेवले आणि एकनाथ शिंदे यांना नगरविकास खात्यावर समाधान मानावे लागले. मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या यापूर्वीच आल्या आहेत. मात्र, या प्रकरणात ते काहीही करू शकले नाहीत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती आघाडीचा भाजपचा शानदार विजय झाल्यानंतर केवळ देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार होते. मात्र आता त्यांच्याकडून गृहमंत्रीपदही हिसकावून घेण्यात आले असून, त्यानंतर आता ते शिवसेनेच्या युबीटीकडे परतण्याचा पवित्रा घेऊ शकतात.