कारंजा : धक्का लागल्याच्या रागातून एका ऑटो चालकाने शिवशाही एसटी बसची तोडफोड (Demolition of Shivshahi ST bus) केली. यात चालक किरकोळ जखमी झाला. तर, बसचे सुमारे ५० हजार रुपयाचे नुकसान झाले. ही घटना ९ जुलै रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास स्थानिक बस स्थानक परिसरात घडली. प्राप्त माहितीनुसार, वाशीम आगाराची शिवशाही बस क्रमांक एमएच ०९ ईएम २२५७ ही नागपूरवरून वाशीमकडे जात होती. या दरम्यान बसस्थानक परिसरात उभ्या अवस्थेत असलेल्या ऑटोला शिवशाही बसचा किरकोळ धक्का (Minor push of Shivshahi bus to Auto) लागला. त्यामुळे संतप्त होऊन ऑटो चालकाने बस चालकाला शिवीगाळ केली.
[read_also content=”आगळ्यावेगळ्या चिखलफेक आंदोलनानंतर १२ तासात काम सुरू, रखडलेल्या कामासाठी युवा संघर्ष मोर्चाचे आंदोलन https://www.navarashtra.com/maharashtra/work-started-in-12-hours-after-a-separate-mudslinging-agitation-agitation-of-yuva-sangharsh-morcha-for-stalled-work-nraa-302634.html”]
प्रकरण एवढ्यावरच न थांबता ऑटो चालकाने शिवशाही बसचा समोरील काच दगड मारून फोडला. या घटनेत बसचे सुमारे ५० हजार रुपयाचे नुकसान झाले. तसेच काच पायाला लागल्याने बस चालक दिलीप काळबांडे जखमी झाले. दरम्यान, यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी ठाणेदार आधरसिंग सोनोने ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले होते.