
rape
पन्हाळा : पन्हाळ्यातील एका अल्पवयीन मुलीवर धमकावून शारीरिक अत्याचार व जबरदस्ती करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी सुशांत प्रभुदास हेगडे वय (३३) राहणार जयसिंगपूर सध्या पन्हाळा येथे वायरमन म्हणून कार्यरत आहे. तो पन्हाळ्यातील एका भाड्याच्या खोलीमध्ये राहत होता त्यामध्ये त्याने दिनांक २७/७/ व ३१/७/२३ या दिवशी एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून धमकवल्याचा प्रकार समोर आला आहे.
पीडित तिच्या कुटुंबीयांनी पन्हाळा पोलीस ठाण्यामध्ये या घटनेची तक्रार दाखल केली आहे त्यानुसार सुशांत हेडगे याला अटक करुन त्याच्यावर पोस्को अंतर्गत कारवाई करून पन्हाळा न्यायालय मध्ये आज हजर करण्यात आले आहे यावेळी पन्हाळा पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर किशोर पाटील ,विनायक पाटील ,सलीम सनदी करित आहेत