Shocking incident in Shirur registering inheritance of land dead person was registered
पिंपरखेड : नावात समानता असल्यामुळे पिंपरखेड येथे अजब प्रकार घडला आहे. मयत व्यतीची वारस नोंद जिवंत व्यक्तीच्या नावावर – शिरूरच्या पिंपरखेड येथील अजब प्रकार घडला आहे. एकाच समान नावाच्या दोन व्यक्ती गावात वास्तव्यास असल्याने यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसाची नोंद गावातील त्याच्या समान नावाच्या जिवंत असणाऱ्या शेतकऱ्याच्या जमिनीवर लावण्याचा अजब प्रकार घडला आहे. त्या गावातील तत्कालीन तलाठी व मंडल अधिकारी यांच्याकडून झाल्याची माहिती समोर आली आहे.
पिंपरखेड ता.शिरूर येथील शेतकरी बाळू बाबू बोंबे यांनी आज दि. २४ ला आमच्या कवठे येमाई येथे दिली आहे. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे एकाच नावाचे दोन शेतकरी असून त्यातील एक शेतकरी हे मयत झालेले आहेत.मयत शेतकऱ्याच्या कायदेशीर वारसानी वारस नोंद करण्याठी महसूल विभागाकडे अर्ज सादर केला होता. मयत शेतकऱ्यांचा मिळकत गट नंबर २६० असून वारस नोंद करण्यासाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केवळ त्याच गटाचा समावेश असताना देखील नावात साम्य असलेल्या नावाच्या दुसन्या शेतकऱ्यांच्या मिळकत नंबर.२६२ गट क्रमांकाचा काहीही उल्लेख व संबंध नसताना वारसनोंद केली आहे. मात्र मयत व्यक्तीच्या वारसांनी सादर केलेल्या अर्जात केवळ मयत शेतकऱ्यांच्या नावे असलेला मिळकत शेतजमीन गट नंबर समाविष्ट केला होता. मात्र तत्कालीन तलाठी तसेच मंडलाधिकारी यांनी वारसनोंदअर्जाची योग्य पाहणी व योग्य शहानिशा न करताच नावात साम्य असलेल्या जिवंत असलेल्या त्याच नावाच्या दुसऱ्या शेतकऱ्याच्या गट क्रमांकावर मयत झालेल्या शेतकऱ्याच्या वारसांची नोंद घातलेली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या बाबत महहसूल विभागाच्या या विभागाच्या प्रांत अधिकारी पूनम अहिरे यांनी माहिती दिली आहे. पत्रकार तथा युवा क्रांती राष्ट्रीय किसान विकास मंच चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रा. सुभाष शेटे यांनी माहिती देत संबंधित शेतकऱ्याला होत असलेल्या नाहक त्रास व मनस्तापाबद्दल माहिती दिली. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील बाळू बाबू बोंबे या हयात असलेल्या शेतकऱ्याच्या सातबारावर मयत झालेल्या त्याच नावाच्या वारसांची नोंद झालेली आढळून येत असून आगामी ३ दिवसांत हे प्रकरण निकाली काढून नक्कीच मार्गी लावले जाईल.
महाराष्ट्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
माणिकराव कोकाटे यांचे विधान चर्चेत
राज्याचे कृषीमंत्री आणि अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेमुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर शिक्षेला आव्हान देण्यासाठी माणिकराव कोकाटे सत्र न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या चांगलीच जुंपली आहे. या राजकीय वातावरणात माणिकराव कोकाटे यांनी एका कार्यक्रमात एक मोठं विधान केलं आहे. ‘आम्हाला मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच दिवशी दम दिला. जास्त मस्ती कराल तर घरी जाल. आमचे पीएस आणि ओएसडी देखील मुख्यमंत्रीच ठरवत असल्यामुळे आमच्या हातात काही राहिलं नाही’, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाची सध्या राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे.