65 अनधिकृत इमारती प्रकरणावरून राजू पाटलांचा शिंदे पिता-पूत्रांवर वार (फोटो सौजन्य-X)
Raju Patil On eknath shinde News Marathi: डोंबिवलीतील 65 अनधिकृत इमारतींच्या प्रकरणावून आता चांगलच राजकारण रंगू लागलं आहे. अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना, नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांना ठाण्यातून अभय आहे,अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार राजू पाटील यांनी शिंदे पिता- पूत्रांवर केली आहे.
65 बेकायदा इमारत प्रकरणावरून मनसे नेते राजू पाटील यांची शिंदे पिता पुत्रांवर नाव न घेता सडकून टीका केली आहे. अनधिकृत बांधकाम करणाऱ्या, कागदपत्र बनवणाऱ्याना, लोकांची फसवणूक करणाऱ्या ठाण्यातून अभय आहे. तसेच सेलेब्रिटीच्या घरी जायला वेळ आहे मात्र 65 इमारती मधील राहिवाशाना भेटायला वेळ नाही, अशी टीका राजू पाटील यांनी केली. इथले पालकमंत्री आहात, नगरविकासमंत्री आहात, तुमचा मुलगा इथला खासदार आहेत. गंगेत डुबकी मारून पुण्य मिळवण्यापेक्षा या राहिवाशांना येऊन भेटा जास्त पुण्य मिळेल. तसेच विधानसभा निवडणुकीत संबंधित बिल्डरला इमारत तोडण्याची धमकी देत काम करायला लावले. ही चैन जोपर्यंत तोडत नाही तोपर्यंत इथे काही होणार नाही. यांचा आका ठाण्यात बसलाय, गॅग ऑफ डोंबिवलीचा आका ठाण्यात आहे . काही लोक हस्तक दिसायला फक्त आमदार आहेत. या रहिवाशांच्या पाठीशी मनसे उभी आहे, त्यांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी लागणारी आर्थिक मदत करू मात्र यांना दिलासा कसा देणार . या प्रकरणी मंत्री गणेश नाईक यांना भेटणार असून फडणवीस यांच्याकडून न्यायाची अपेक्षा असल्याचं राजू पाटील यांनी यावेळी आहे.
6500 रहिवाशांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. डोंबिवली प्रकरणात महापालिकेपासून रेरापर्यंत सगळ्यांची फसवणूक करण्यात आल्याचं दिसून येत आहे. या इमारतींसाठी रेराकडून परवानगी पत्र देण्यात आलं होतं. त्याच्याच आधारावर बँकांनीही ग्राहकांना कर्ज दिलं. धक्कादायक बाब म्हणजे बँकांनी कोणतीही काळजी घेतलेली दिसत नाही. बँकेने कागदपत्रांची शहानिशा करणं अपेक्षित होतं. मात्र बँकेने त्यांच्यापुढे सादर करण्यात आलेली कागदपत्रे तपासली नाहीत.
‘जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात काही बेकायदा बांधकामातील घरांचे रजिस्ट्रेशन झाले आहे. गँग्स ऑफ डोंबिवली या मागे आहे. कागदपत्र तयार करणारे मोठे स्कॅमर आहे. या प्रकरणाचा तपास डीसीपींनी करावा या प्रकरणी पोलिस आयुक्तांचीही भेट घेणार आहे. ज्या लोकांच्या विरोधात या प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. तेच लोक या रजिस्ट्रेशन घोटाळ्यात आहेत’, असे म्हटले आहे.