Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बुलढाण्यात जनगणना २०२७ साठी प्रशासन सज्ज; अधिकारी-कर्मचाऱ्यांचे दोनदिवसीय प्रशिक्षण सुरू

Buldhana Census Staff Training 2027: जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी बुलढाणा जिल्ह्यात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 20, 2026 | 09:28 PM
Buldhana Census Staff Training

Buldhana Census Staff Training

Follow Us
Follow Us:
  • जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी बुलढाण्यात नियोजन
  • जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी सुरू
  • प्रशासकीय यंत्रणा सज्ज
बुलढाणा: देशाच्या जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्याच्या कामकाजाला सुरुवात झाली असून, या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यात जनगणनेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षणास सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित या प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे उपस्थित होते. (Buldhana  News)

Buldhana: दिवाळीच्या मुहूर्तावर वाहन खरेदीचा धमाका; बुलढाण्यात १,२४४ वाहनांची नोंदणी; ३ कोटींहून अधिक उलाढाल

जनगणनेच्या कामासाठी यंत्रणा सज्ज

जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात घरयादी तयार करणे आणि गणना गट निश्चित करणे, ही कामे करण्यात येणार आहे. या प्रक्रियेचे प्रभावी नियोजन करून प्रत्यक्ष जनगणनेच्या कामासाठी यंत्रणा सज्ज करण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. जिल्हास्तरीय प्रशिक्षणात जनगणना संचालनालयाचे सहायक संचालक प्रवीण भगत तसेच सांख्यिकी अन्वेषक वर्ग-२ निहाल धरंधरे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यातील पूर्वतयारी, कामकाजाची पद्धत आणि जबाबदाऱ्यांबाबत मार्गदर्शन केले.

जनगणनेचा दुसरा टप्पा व्यापक स्वरूपाचा असल्याने मोठ्या प्रमाणात प्रगणक, पर्यवेक्षक आणि प्रशासकीय यंत्रणेची आवश्यकता आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी तसेच जनगणनेशी संबंधित यंत्रणेतील अधिकारी या प्रशिक्षणास उपस्थित आहेत. या प्रशिक्षणासाठी जनगणना कक्षाच्या संजीवनी मुंपडे, तहसीलदार (सामान्य प्रशासन), पी. के. करे, नायब तहसीलदार तसेच सहायक महसूल अधिकारी अपेक्षा जाधव यांनी सहकार्य केले.

उपाययोजनांबाबतही प्रशिक्षणात मार्गदर्शन

जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक व्यक्तीकडून ४० प्रश्नांच्या माध्यमातून माहिती संकलित करण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांची सामाजिक व आर्थिक स्थिती जाणून घेण्यात येणार आहे. नागरिकांना स्वतःहून माहिती भरण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर प्रगणक प्रत्येक घरी भेट देऊन संकलित माहितीची पडताळणी करणार आहेत. जनगणनेच्या प्रत्यक्ष कामकाजादरम्यान उद्भवणाऱ्या संभाव्य समस्या आणि त्यावरील उपाययोजनांबाबतही प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यात आले. जनगणनेचे काम अचूक, पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

Buldhana: शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट! खरीपने दिला फटका,आता रब्बीचा हंगामही अडचणीत; ९० हजार हेक्टरवरच पेरणी

💡

Frequently Asked Questions

  • Que: बुलढाणा जिल्ह्यात जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात कोणती कामे होणार आहेत?

    Ans: घरयादी तयार करणे आणि गणना गट निश्चित करणे ही कामे होणार आहेत.

  • Que: जनगणना प्रशिक्षणाचे उद्घाटन कोणी केले?

    Ans: जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी उद्घाटन केले.

  • Que: जनगणनेत नागरिकांना किती प्रश्न विचारले जाणार आहेत?

    Ans: प्रत्येक व्यक्तीकडून ४० प्रश्नांच्या माध्यमातून माहिती संकलित केली जाणार आहे.

Web Title: Buldhana census 2027 staff training second phase began pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 09:28 PM

Topics:  

  • Buldhana
  • buldhana news
  • Census

संबंधित बातम्या

Buldhana: दिवाळीच्या मुहूर्तावर वाहन खरेदीचा धमाका; बुलढाण्यात १,२४४ वाहनांची नोंदणी; ३ कोटींहून अधिक उलाढाल
1

Buldhana: दिवाळीच्या मुहूर्तावर वाहन खरेदीचा धमाका; बुलढाण्यात १,२४४ वाहनांची नोंदणी; ३ कोटींहून अधिक उलाढाल

Malegaon News: मालेगावला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी नगर पंचायतीचा पुढाकार; व्यापारी अन् नागरिकांना केले आवाहन
2

Malegaon News: मालेगावला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी नगर पंचायतीचा पुढाकार; व्यापारी अन् नागरिकांना केले आवाहन

Buldhana: शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट! खरीपने दिला फटका,आता रब्बीचा हंगामही अडचणीत; ९० हजार हेक्टरवरच पेरणी
3

Buldhana: शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट! खरीपने दिला फटका,आता रब्बीचा हंगामही अडचणीत; ९० हजार हेक्टरवरच पेरणी

Buldhana: दुष्काळाच्या संकटात शासनाचा आधार; बुलढाणा जिल्ह्यात २१५ कोटींचे अनुदान वितरित;  ४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मदत
4

Buldhana: दुष्काळाच्या संकटात शासनाचा आधार; बुलढाणा जिल्ह्यात २१५ कोटींचे अनुदान वितरित; ४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.