सिंधुदुर्गनगरी: नरेंद्र महाराजांच्या बद्दल एकेरी शब्दात काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी काढलेल्या वक्तव्याच्या निषेध सिंधुदुर्गमध्ये करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नरेंद्र महाराज भक्त सेवा मंडळ सिंधुदुर्ग सेवा समितीच्या वतीने निषेध मोर्चा का प्रशासनाचे लक्ष वेधले. याबाबत त्यांनी माफी न मागितल्यास आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा इशारा ही दिला आहे.जगद्गुरु नरेंद्रजी महाराज भक्तसेवा मंडळ जिल्हा सेवा समितीच्या वतीने पिठ प्रमुख सुदीन तेंडुलकर जिल्हाध्यक्ष दिनेश मुंबरकर मुख्यपीठ सहाय्यक दीपक खरडेजनम प्रवचनकार प्रिया परब विलास परब सिद्धी बोंद्रे रमिला बागकर तनवी मोर्ये रेश्मा नाईक गौरी खोचरे पद्मानंद करंगुटकर अभिषेक राऊत आदींसह जिल्हातील नरेंद्र महाराज यांचे भक्त मोठ्या संख्येने मोर्चा सहभागी झाले होते.
नागपूर येथे काँग्रेसचे नेते विजय वडट्टीवार यांनी नरेंद्र महाराज यांच्या बद्दल काढलेल्या वक्तव्याबद्दल निषेध नोंदविण्यासाठी जिल्ह्यातील नरेंद्रभक्त यांनी ओरोस तिठा ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत मोर्चा काढण्यात आला. वडेट्टीवार यांच्याबद्दल निषेधच्या घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पडती वार्ड यांच्या निषेदाचे केलेले फलक फाडत त्यांच्या फोटोला चपला मारत निषेध नोंदवला. यामध्ये मोठ्या प्रमाणात नरेंद्र भक्त प्रेमी महिला उपस्थित होत्या जगद्गुरु रामानंद स्वामी नरेंद्र महाराज यांच्या बद्दल एकेरी शब्दाने वापर शब्दाचा वापर करून केलेल्या या अपमणाबाबत त्यांनी माफी मागावी प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करावी, यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांना निवेदनही सादर केलेआमच्या जगद्गुरुचा आम्ही असा प्रकारचा अपमान सहन करणार नाही .आम्ही या घटनेचा निषेध करतो हिंदूंच्या भावना यामुळे दुखावल्या असून अशा प्रकारच्या या वडेट्टीवाडयांच्या अपप्रवृत्ती बाबत आम्हाला किंवा वाटते.
संत हे समाजाच्या उन्नतीसाठी काम करत असतात, वडेट्टीवार यांच्या वक्तव्यामुळे आमच्या भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत त्यांनी माफी मागितलीच पाहिजे. अशा पवित्र व्यक्तीबद्दल अनादाराची भाषा वापरणाऱ्या वडेट्टीवार वाढ यांना माफी नाहीअसे यावेळी पीठ प्रमुख सुधीन तेंडुलकर यांनी सांगितले. ओरोस तिठा तेजिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत निघालेल्या या मोर्चात अनेक भक्तांच्या हातात विजय वडट्टीवार यांच्या निषेचा फलक दिसत होता.
राज्यात सध्या हिंदू जनजागरण चळवळ सुरू आहे हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्या घटना काही प्रमाणात आतापर्यंत घडल्या काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या माध्यमातून जगद्गुरु नरेंद्र महाराज यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यावर सिंधुदुर्ग तर अन्य जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. नरेंद्र महाराज सेवा समितीच्या वतीने आज सिंधुदुर्गात अचानक मूक मोर्चा काढणार असे जाहीर केले होते. परंतु त्याचे पडसाद उमटून निषेध मोर्चा काढला सिंधुदुर्गात आणि अन्य जिल्ह्यातही हे पडसाद उमटत आहेत जोपर्यंत कॉग्रेसनेले विजय वड्डेटीवारमाफी मागत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. असाच पवित्रा भक्तांनी घेतला आहे त्यामुळे यावर काय पडसाद म्हणतात काँग्रेसने ते विजय वडेट्टीवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.