
कोकणवासियांसाठी मोठी बातमी! 3 फेब्रुवारीपर्यंत 'हा' मार्ग राहणार बंद; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश
रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू
सावंतवाडी व ओटवणेतून पर्यायी मार्ग
दाणोली-बांदा राज्य मार्ग महिनाभर बंद
सावंतवाडी: दाणोली-बावळाट ते बांदा या राज्यमार्गाचे रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर ६ जानेवारीला सकाळी १० वाजेपासून ते ३ फेब्रुवारी २०२६ च्या रात्री १२ वाजेपर्यंत या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पर्यायी मागांची व्यवस्था करण्यात आली आहे. अवजड वाहने आता बेळगाव-वेंगुर्ला राष्ट्रीय महामार्गावरून सावंतवाडी मार्गे जातील, तर हलकी वाहने सातुळी पूल, ओटवणे आणि माजगाव मार्गे सावंतवाडीला जाऊ शकतील. दाणोली ते बांदा वा १६ किमी लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम सध्या सुरू आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कामाचा वेग वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
अवजड वाहतुकीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
वाहनचालकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. बांदा दाणोली, आंचोली या रस्त्यावर अवजड वाहतुकीमुळे होणा-या अपघातांबाबत व नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात तातडीच्या उपाययोजनांची करण्यासंदर्भात माननीय जिल्हा अधिकारी यांच्याकडे सदर निवेदनाद्वारे सांगण्यात आले. या रस्त्यावर बांदा निमजगा, गवळीटॅब, मेटकरवाडी, गडगेवाडी भागात मोठ्या प्रमाणावर दहा चाकी डंपर, ट्रक व इतर अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे.
Kolhapur News : महामार्गाकरिता जमिनीचं मोजमाप; बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाईत मिळणार चौपट मोबदला
पादचाऱ्यांना धोका…
सदर मार्ग अरुंद असून परिसरात शाळा, वस्ती, बाजारपेठ तसेच रस्त्याची दुरुस्ती, इतर बांधकामाची कामे सुरू आहेत. अशा परिस्थितीत अवजड़ वाहतुकीमुळे वारंवार अपघात घडत असून नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. अनेक वेळा अपघात घडवून संबंधित वाहनाविरोधात तात्काळ कारवाई होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. काही ठिकाणी विदयुत खांब रस्त्यावरील संरचना कोसळणे, वाहतूक कोंडी तसेच विदयाध्याना व पादचा-यांना धोका निर्माण होण्याचे प्रकार घडले आहेत. है प्रकार सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक आहेत, मोटार वाहन अधिनियम, सीआरपीसी कलम १३३ तसेच संबंधित नियमांनुसार अशा चौकादायक वाहतुकीवर निर्बंध घालणे, मार्ग बदलणे, वेलेवे नियमन करणे व फिटनेस, परवाने तपासणे आवश्यक आहे.
अरे बापरे! Mumbai-Goa महामार्गाचे काम आणखी लांबणीवर? ‘या’ कारणांमुळे होतोय उशीर
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.