मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले (फोटो - istockphoto)
अनेक वर्ष सुरू आहे महामार्गाचे काम
पनवेल ते सिंधुदुर्ग असा ४६६ किलोमीटरचा असणार मार्ग
व्यापार, पर्यटनयासाठी ठरणार महत्वाचा
खेड: मुंबई ते गोवा हा राष्ट्रीय महामार्ग (एनएच-६६) फोरलेन करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सध्याचा १२ ते १३ तासांचा प्रवास अवघ्या ६ तासांत होणार असला, तरी विविध अडथळ्यांमुळे कामाला अपेक्षित गत्ती मिळत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. पनवेल ते सिंधुदुर्ग (Mumbai Goa Highway)असा सुमारे ४६६ किलोमीटरचा हा महामार्ग कोकणातील पर्यटन, व्यापार व दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पनवेल ते इंदापूर हा टप्पा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचआए) विकसित केला जात असून उर्वरित भाग केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अखत्यारित आहे. प्रकल्पाला मुख्य अडथळे इंदापूर दरम्यान सुमारे ३ किलोमीटर व माष्णगाव येथे सुमारे ७ किलोमीटर लांबीच्या बायपास रस्त्यांमुळे निर्माण झाले आहेत.
अनेक वर्षे लांबला
अडचणी, भूसंपादनातील वनजमिनीच्या मंजुरीसाठी लागणारा वेळ आणि कंत्राटदारांच्या अडचणी यामुळे प्रकल्प अनेक वर्षे लांबला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. माणगावपासून पुढील बहुतांश महामागांचे काम पूर्ण झाले असून परशुराम घाट ते झारप हा टप्पा जवळपास तयार आहे. मात्र इंदापूर आणि माणगाव बायपास नसल्यामुळे वाहनांना शहरातून जावे लागते. त्यामुळे वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका व प्रवासासाठी जादा वेळ लागतो. विशेषतः सणासुदीच्या काळात तासनतास वाहतूक कोंडी होते.
National Highway: मुंबई-गोवा महामार्गप्रश्नी कोकणात ‘एल्गार’; जनआक्रोश समितीने थेट…
महामार्गावर वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका
बायपास मूळ करारात समाविष्ट असतानाही ठेकेदाराकडून ते पूर्ण न झाल्याने नव्याने टेंडर प्रक्रिया राबवावी लागली. यामुळे कामाला मोठा विलंब झाला अहे. याशिवाय लाजा, निवली, पाली व संगमेश्वर चिपळूण येथील पलायओव्हरची कामेही अद्याप अपूर्ण आहेत.
सद्यः स्थितीत आणखी विलंब होण्याची शक्यता
बायपास अभावी चालकांना सतत सावधगिरी बाळगावी लागत असल्याने प्रवास अचिक त्रासदायक ठरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ४ फ्लायओव्हर मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असून इंदापूर आणि माणगाव बायपासचे काम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे. जरी एकूण प्रकल्पाची मुदत २०२६ अशी निश्चित करण्यात आली असली, तरी सद्याद्यस्थितीत आणखी विलब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यासाठी नवीन टेंडर प्रक्रिया आणि पर्यायी उपाययोजना सबवण्याचे प्रधान सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आल आहे. लवकरच हा महामार्ग सुरक्षित, सुकर आणि जलद प्रवासाचा पर्याय बनेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






