Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिल्हा बँकेत भाजपला सत्तेबाहेर ठेवत राष्ट्रवादी-शिंदेसेनेचा ‘राजकीय वचपा’; भाजपच्या अंतर्गत गटबाजीचेही पितळ उघडे

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेसेनेने भाजपला धक्का दिला आहे. उदयसिंह पाटील-उंडाळकर अध्यक्ष, तर दीपक चव्हाण उपाध्यक्ष झाले असून, या सत्तांतरामागे जिल्हा परिषदेतील राजकीय सत्तासमीकरणांचा ‘वचपा’ असल्याची चर्चा आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 18, 2026 | 05:08 PM
Satara District Central Bank politics_ BJP out of power

Satara District Central Bank politics_ BJP out of power

Follow Us
Follow Us:
  • सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे राजकारण
  • भाजपला सत्तेतून दूर ठेवत राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेने अध्यक्ष-उपाध्यक्षपदावर कब्जा
  • राज्यात महायुती सरकार असूनही साताऱ्यात अंतर्गत राजकारण समोर

Satara District Central Co-operative Bank Election :
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्तेच्या सारीपाटावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेसेनेने भाजपला चारीमुंड्या चीत करत नवा राजकीय डाव टाकला आहे. जिल्ह्याच्या राजकारणात महायुती म्हणून एकत्र असल्याचा दावा करणाऱ्या भाजपला बँकेच्या सत्तेतून दूर ठेवत राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेने अध्यक्ष-उपाध्यक्षपदावर कब्जा केला.

अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे उदयसिंह पाटील-उंडाळकर, तर उपाध्यक्षपदी शिंदेसेनेचे माजी आमदार दीपक चव्हाण यांची निवड झाली. हा केवळ पदांचा विजय नसून जिल्ह्याच्या राजकारणातील भाजपच्या वर्चस्वाला दिलेला थेट शह मानला जात आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या सत्तासमीकरणात भाजपने घेतलेली आघाडी आणि राष्ट्रवादी व शिंदेसेनेच्या राजकीय अपेक्षांना बसलेला धक्का, याची सल या निवडीतून बाहेर पडल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

जिल्हा परिषदेतील राजकीय गणितांचा वचपा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काढण्यात आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे सहकारातील ही निवडणूक केवळ संचालक मंडळापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वाच्या संघर्षाचे केंद्र बनली आहे.

Yogi Adityanath Golden Earrings : योगी आदित्यनाथ कानात सोन्याची कुंडलं का घालतात? जाणून घ्या धार्मिक परंपरा अन् किंमत

या सत्तांतरातील सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेने साधलेली राजकीय मोट. एकीकडे राज्यात महायुतीचे सरकार आणि दुसरीकडे साताऱ्यात महायुतीतील घटक पक्षांनीच भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे, हा विरोधाभास अनेक प्रश्न उपस्थित करणारा आहे. मग महायुतीचे राजकीय समीकरण जिल्ह्यात केवळ निवडणुकीपुरतेच आहे का? की स्थानिक नेतृत्वाला भाजपचे वाढते वर्चस्व मान्य नाही? या प्रश्नांची उत्तरे आगामी राजकारणातून मिळतील.

हा खरा आत्मपरीक्षणाचा मुद्दा

भाजपसाठी हा धक्का अधिक गंभीर ठरण्यामागे पक्षांतर्गत मतभेदांची चर्चाही कारणीभूत आहे. जिल्ह्यातील भाजपचे नेतृत्व एकाच दिशेने काम करत आहे का, की अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाची राजकीय ताकद विभागली जात आहे, हा चर्चेचा विषय बनला आहे. विरोधकांनी एकत्र येऊन डाव साधला, हे एकवेळ समजण्यासारखे आहे; मात्र स्वपक्षातील सर्व नेत्यांना एकत्र ठेवण्यात भाजपला यश आले का, हा खरा आत्मपरीक्षणाचा मुद्दा आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी लतीफ भटचा खात्मा; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी केले सुरक्षा दलाचे कौतुक

जिल्हा बँक ही केवळ आर्थिक संस्था नाही. जिल्ह्यातील सहकार, साखर कारखाने, सोसायट्या, शेतकरी आणि ग्रामीण अर्थकारणावर तिचा प्रभाव आहे. त्यामुळे अध्यक्षपदाचा ताबा म्हणजे सहकाराच्या माध्यमातून राजकीय संपर्क आणि प्रभाव टिकवण्याची मोठी संधी. उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला सहकारातील आपली पकड अधिक मजबूत करण्याची संधी मिळाली आहे, तर दीपक चव्हाण यांच्या निवडीने शिंदेसेनेनेही आपले राजकीय महत्त्व अधोरेखित केले आहे.

एकूणच, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपला सत्तेबाहेर ठेवून राष्ट्रवादी-शिंदेसेनेने केवळ अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची लढाई जिंकलेली नाही, तर साताऱ्यातील राजकीय वर्चस्वाच्या लढाईत नवे समीकरण उभे केले आहे. भाजपला आता केवळ विरोधकांच्या डावपेचांना उत्तर देऊन चालणार नाही, तर स्वतःच्या घरातील विस्कटलेली घडीही सावरावी लागणार आहे. अन्यथा जिल्हा बँकेतील हा सत्तेचा धक्का आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणातही भाजपसाठी धोक्याची घंटा ठरू शकतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली?

    Ans: राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची अध्यक्षपदी निवड झाली.

  • Que: जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली?

    Ans: शिंदेसेनेचे माजी आमदार दीपक चव्हाण यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.

  • Que: जिल्हा बँकेतील सत्तांतराची राजकीय चर्चा का होत आहे?

    Ans: महायुतीचा भाग असलेल्या राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेने भाजपला सत्तेबाहेर ठेवत बँकेची सत्ता मिळवली. त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीच्या स्थानिक राजकीय समीकरणांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Web Title: Satara district bank election ncp shinde sena bjp political equation nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 05:08 PM

Topics:  

  • Satara Bank
  • Satara District Bank Election
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara Politics: आगे आगे देखो, होता है क्या…; सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीनंतर जयकुमार गोरेंचा इशारा
1

Satara Politics: आगे आगे देखो, होता है क्या…; सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीनंतर जयकुमार गोरेंचा इशारा

Satara District bank  Election 2026:शिवसेना-राष्ट्रवादीचा भाजपला जोरदार धक्का! सातारा जिल्हा बँकेत भाजपचा पराभव 
2

Satara District bank  Election 2026:शिवसेना-राष्ट्रवादीचा भाजपला जोरदार धक्का! सातारा जिल्हा बँकेत भाजपचा पराभव 

MSEDCL Launches Abhay Yojana: बारामती परिमंडलातील २.८१ लाख ग्राहकांसाठी महावितरणची ‘अभय योजना २०२६-२७’ लागू
3

MSEDCL Launches Abhay Yojana: बारामती परिमंडलातील २.८१ लाख ग्राहकांसाठी महावितरणची ‘अभय योजना २०२६-२७’ लागू

Satara News : पाणीबचतीचे आदेश कागदावरच; धोम उजव्या कालव्यातून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय
4

Satara News : पाणीबचतीचे आदेश कागदावरच; धोम उजव्या कालव्यातून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.