Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुर्दैवी ! भावाच्या लग्नाला आलेल्या बहिणीचा मृत्यू; विजेचा तीव्र धक्का बसला अन् क्षणांत होत्याचं नव्हतं झालं

नागभीड येथे स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. त्यामुळे घरात आनंदी वातावरण होते. या स्वागत समारंभाच्या तयारीत घरचे सर्वच गुंतले होते. त्यात स्नेहाचाही समावेश होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 14, 2026 | 11:09 AM
प्रसूतीनंतर काही तासांत मातेचा मृत्यू; सिजेरियननंतर प्रकृती बिघडली अन् डॉक्टरांनी...

प्रसूतीनंतर काही तासांत मातेचा मृत्यू; सिजेरियननंतर प्रकृती बिघडली अन् डॉक्टरांनी...

Follow Us
Follow Us:

चंद्रपूर : स्वागत समारंभाची तयारी सुरू असताना नवरदेवाच्या बहिणीस विजेचा धक्का लागला आणि यातच तिचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना सोमवारी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान नागभीड येथे घडली. स्नेहा विशाल वरभे (वय ३८, रा. भद्रावती) असे मृतक महिलेचे नाव असून, नागभीड येथील तिचा भाऊ अक्षय बाबुराव कायरकर याचे लग्न रविवारी ब्रह्मपुरी येथे थाटामाटात पार पडले.

सोमवारी नागभीड येथे स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. त्यामुळे घरात आनंदी वातावरण होते. या स्वागत समारंभाच्या तयारीत घरचे सर्वच गुंतले होते. त्यात स्नेहाचाही समावेश होता. स्नेहा काही तरी धुण्यासाठी घराच्या बोळीत गेली आणि तिचा हाताचा एका विद्युत वायरला स्पर्श झाला आणि तिला विजेचा तीव्र धक्का बसला. हा धक्का इतका तीव्र होता की, काही कळायच्या आत क्षणात ती खाली कोसळली. तिथेच उभे असलेल्या इतर नातेवाईकांच्या लक्षात ही बाब आली आणि क्षणाचाही विलंब न लावता तिला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेदेखील वाचा : चिमुकल्यावर पडली विजेची तार, मृत्यूने विळखा घातलाच होता तेवढ्यात झालं माणुसकीचं दर्शन; हृदय हेलावणारी दृश्ये अन् Video Viral

दरम्यान, स्नेहा वरभे यांची अवस्था लक्षात घेता शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. लगेच तिला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, काही अवधीतच तिचा मृत्यू झाला आणि बघता बघता आनंददायी वातावरण दुःखमय बनले. अकस्मात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने सर्व कायरकर व वरभे परिवार हादरून गेला आहे. सदर मृतक महिलेला पती व दोन जुळे मुलं आहेत. सदर घटनेबद्दल नागभीड येथे हळहळ व्यक्त होत आहे.

कपडे वाळवताना लेकीला विजेचा धक्का

दुसरीकडे, पावसाळ्यात विजेचा धक्का लागून अनेक दुर्घटना घडत असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर जळगाव शहरातील अक्सानगर येथे एक हृदयद्रावक घटना घडली. या दुर्घटनेत बाप आणि लेकीचा जागीच मृत्यू झाला. घराच्या छतावर कपडे वाळवत असताना उच्चदाबाच्या वीजवाहक तारेला स्पर्श झाल्याने या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

Web Title: Sister attending brothers wedding dies of electric shock

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 11:04 AM

Topics:  

  • chandrapur news
  • Electric Shock

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.