(फोटो सौजन्य: Instagram)
आजच्या या कलियुगात जिथे आपलेच आपले राहिले नाहीत तिथे लोकांच्या माणुसकीची अपेक्षा कारणंही व्यर्थ्य आहे. लोक आपल्या व्यस्त जीवनात इतके रमून गेले आहेत की त्यांना आजूबाजूच्या परिस्थितीचेही भान राहत नाही. प्रत्येकजण आपल्याच विश्वात रमलेलं असतं जिथे दुसऱ्या कोणाचीच किंमत केली जात नाही. पण अलीकडेच माणुसकीचे दर्शन घडवणारे एक अनोखे आणि दुर्लभ दृश्य दिसून आले आहे ज्यात व्यक्तीने स्वतःचा जीव धोक्यात घालत चिमुकल्या जीवाचे प्राण वाचवले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होत आहे. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओ?
पावसाळ्यात अनेकदा असे दिसून येते की खांब पडतात किंवा तारा तुटतात. त्यामुळे वीज जमिनीपर्यंत पसरते. अशा परिस्थितीत अनेक वेळा अशा घटना समोर येतात. ज्यामुळे हे प्रकरण लोकांच्या जीवावर बेतते. अशीच काहीशी घटना व्हिडिओमध्ये एका चिमुकल्यासोबत घडल्याचे दिसून आले आहे ज्यात एका लहान मुलावर रस्त्याने जाताना अचानक विजेची तार पडते. मुलगा मृत्यूच्या विळख्यात असा अडकला जातो की त्यातून त्याला स्वतःची सुटका करता येत नाही, तो वेदनेने कळवळत राहतो पण कुणीही विजेच्या भीतीने त्याच्या जवळ जात नाही. अशातच व्हिडिओत आपल्याला एक चाचा कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता मुलाच्या मदतीसाठी धावत येताना दिसून येतात. ते प्रथम थेट मुलाकडे जातात आणि त्यांना जोरदार झटका येतो. त्यानंतर ते मागे सरकतात आणि टॉवेलच्या मदतीने मुलाला स्वतःकडे ओढतात आणि विजेच्या तारेतून त्याची सुटका करतात. चाचाच्या प्रसंगावधानामुळे वेळीच मुलाचा जीव वाचतो. त्यांचे हे कृत्य खरंच प्रशंसेस पात्र आहे, हा व्हिडिओ अजूनही जगात माणुसकी जिवंत आहे यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडतो.
घटनेचा व्हायरल व्हिडिओ @true.line__ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “करंट होता का” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “चाचांना माझ्याकडून सलाम” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “जर सर्वांचे मन असे झाले तर हिंदू आणि मुस्लिमांमध्ये कधीही शत्रुत्व राहणार नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.