Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Bank Election : सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे बिगूल वाजले; पहिल्याच दिवशी सहा अर्ज

२६ व २७ सप्टेंबर रोजी शासकीय सुट्टी असल्याने या दिवशी अर्ज विक्री व स्वीकारण्याची प्रक्रिया बंद राहणार आहे. त्यानंतर २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 26, 2026 | 09:32 AM
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे बिगूल वाजले; पहिल्याच दिवशी सहा अर्ज

सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे बिगूल वाजले; पहिल्याच दिवशी सहा अर्ज

Follow Us
Follow Us:

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी विविध मतदारसंघांतून सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने निवडणूक प्रक्रियेला सुरुवातीपासूनच वेग आला आहे. कोरेगाव तालुका मतदारसंघातून सुनील रवेलचंद खत्री यांनी दोन नामनिर्देशनपत्रे दाखल केली.

गृहनिर्माण सहकारी संस्था तसेच दूध उत्पादक, पशुपैदास, वराह पालन, कुक्कुटपालन व शेळी-मेंढी पालन संस्था मतदारसंघातून छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह भोसले यांनी अर्ज दाखल केला. फलटण तालुका विकास सेवा सहकारी संस्था व धान्य अधिकोष मतदारसंघातून संजीवराजे विजयसिंह नाईक-निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज भरला. अनुसूचित जाती-जमाती राखीव मतदारसंघातून दीपक प्रल्हाद चव्हाण, नागरी बँका, नागरी सहकारी पतपेढ्या, ग्रामीण बिगरशेती संस्था व पगारदार नोकरांच्या पतसंस्था मतदारसंघातून सुरभी मदन भोसले, तर महिला राखीव मतदारसंघातून अनुपमा शाहूराज फाळके यांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली.

Satara District Bank Election : सातारा जिल्हा बँकेत सत्तासंघर्ष तापणार! आचारसंहिता लागू; १ मतदान तर ३ नोव्हेंबरला निकाल

दरम्यान, २६ व २७ सप्टेंबर रोजी शासकीय सुट्टी असल्याने या दिवशी अर्ज विक्री व स्वीकारण्याची प्रक्रिया बंद राहणार आहे. त्यानंतर २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत. निवडणूक कार्यालयातील गर्दी टाळण्यासाठी अर्ज दाखल करताना केवळ उमेदवार किंवा सूचक यांनीच उपस्थित राहावे, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा यांनी स्पष्ट केले आहे. समर्थक व इतर व्यक्तींनी कार्यालयात गर्दी करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

सन २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी होणाऱ्या या निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी संबंधितांनी निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Web Title: Six applications for satara district bank elections on the first day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 09:32 AM

Topics:  

  • Satara District Bank Election

संबंधित बातम्या

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
1

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

सातारा जिल्हा बँकेच्या राजकारणाला आता वेग; 21 जागांसाठी 2019 मतदार, इच्छुकांची धावपळ
2

सातारा जिल्हा बँकेच्या राजकारणाला आता वेग; 21 जागांसाठी 2019 मतदार, इच्छुकांची धावपळ

सातारा जिल्हा बँकेच्या रणधुमाळीआधी उदयनराजेंचा ‘सहकाराचा मंत्र’; निवडणुकीतील समीकरणांवर चर्चेला उधाण
3

सातारा जिल्हा बँकेच्या रणधुमाळीआधी उदयनराजेंचा ‘सहकाराचा मंत्र’; निवडणुकीतील समीकरणांवर चर्चेला उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.