Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News: राज्यात GBS चा धोका वाढला! कोल्हापुरात 60 वर्षीय महिलेचा मृत्यू; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा रोग नवीन नसून, तो अनेक वर्षांपासून ओळखला जातो. हा संसर्गजन्य रोग नसला, तरी काही वेळा जीवाणू किंवा विषाणूच्या संसर्गानंतर तो विकसित होऊ शकतो.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 14, 2025 | 06:33 PM
जीबी सिंड्रोमचा महाराष्ट्रात धोका वाढला

जीबी सिंड्रोमचा महाराष्ट्रात धोका वाढला

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात गेली महिनाभरापासून चंदगड तालुक्यातील  गुइलेन-बॅरे सिंड्रोम बाधित एका महिला रुग्णावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. दरम्यान, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या जिल्ह्यात जीबीएसचा हा पहिलाच मृत्यू असल्याचे सांगितलं जात आहे. तर या महिलेवर गेल्या काही दिवसांपासून चंदगडच्या शासकीय दवाखान्यात उपचार सुरू होते. ६० वर्षीय महिलेचा मृत्यू जीबीएस आजाराने झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

राज्यात एकीकडे गुलेन बॅरी सिंड्रोमचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत असताना दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. चार दिवसांपूर्वी चंदगड तालुक्यातील ही ६० वर्षीय महिला सीबी सेंट्रल बाधित आजारामुळे कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णांलयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल  झाली होती. रुग्णांलयाच्या डॉक्टरांनी या वृद्धेवर उपचार केले. मात्र, आज सकाळी महिलेचा मृत्यू झाला.

हेही वाचा: Mumbai GBS News: मुंबईकरांनो सावधान! जीबीएसचा पहिला मृत्यू, राज्यात GBS मुळे 8 रुग्णांचा मृत्यू

पुण्यात जीबीएस रुग्णांचे प्रमाण  वाढत असताना या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि सीपीआर रुग्णालयाला सतर्कतेच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ६० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी गोंधळून न जाता सतर्क राहण्याचं आवाहन छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशीर मिरगुंडे यांनी केलं आहे.

 गेल्या वर्षभरात जीबीएस आजारांमुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या दरवर्षीप्रमाणे आहे. मात्र, यंदा पुण्यात या आजाराचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाल्याने या आजाराचा धोका वाढला आहे. सध्या, कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णांलयाच्या अतिदक्षता विभागात आठ जणांवर राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ .एस .एस.मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय उपचार सुरू आहेत. यामध्ये पाच रुग्ण प्रौढ तर तीन बालक आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता रोजच्या आहारात शिळे अन्न टाळावे आणि पाणी उकळून प्यावे. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढेल, अशाच अन्नाचं सेवन करण्याचं आवाहन जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मीळ स्वयंप्रतिकार  स्वरुपाचा विकार आहे, ज्यात शरीराची रोगप्रतिकारशक्ती स्वतःच्याच चेतासंस्‍थांवर  हल्ला करते. यामुळे स्नायू कमजोर होतात आणि गंभीर रुग्णामध्ये पक्षाघातही होऊ शकतो. गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) हा संसर्गजन्यरोग नाही. तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरत नाही. याचे निश्चित कारण अज्ञात आहे. हा आजार एखाद्या श्वसन किंवा पचनसंस्थेच्या संसर्गानंतर होतो. त्यावर तातडीने उपचार करणे आवश्यक आहे.
गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा रोग नवीन नसून, तो अनेक वर्षांपासून ओळखला जातो. हा संसर्गजन्य रोग नसला, तरी काही वेळा जीवाणू किंवा विषाणूच्या संसर्गानंतर तो विकसित होऊ शकतो. तसेच  इतर अनेक कारणेही असतात. गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा रोग वर्षभर आढळतो. साधारणपणे १ लाख लोकांमध्ये एकजण या रोगाने ग्रस्त असतो. त्यामुळे, मुंबईतील मोठी रूग्‍णालये , वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दर महिन्याला ‘जीबीएस’ चे काही रुग्ण उपचारासाठी येतात.

Web Title: Sixty years old woman loss their life gbs virus kolhapur maharashtra health update marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2025 | 06:33 PM

Topics:  

  • GBS virus
  • Health News
  • kolhapur

संबंधित बातम्या

Koyna Dam: सांगली-कोल्हापूरवर महापुराचे संकट; कोयनेतून तब्बल ८०,५०० क्युसेकने विसर्ग सुरू
1

Koyna Dam: सांगली-कोल्हापूरवर महापुराचे संकट; कोयनेतून तब्बल ८०,५०० क्युसेकने विसर्ग सुरू

CJI Bhushan Gawai: “आता खंडपीठ उभारणीसाठी…”; CJI भूषण गवई यांचे कोल्हापुरात प्रतिपादन
2

CJI Bhushan Gawai: “आता खंडपीठ उभारणीसाठी…”; CJI भूषण गवई यांचे कोल्हापुरात प्रतिपादन

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत
3

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन
4

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.