Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माती परीक्षणातून जमिनीचे आरोग्य मूल्यांकन! २७ हजारांवर शेतकऱ्यांचा सहभाग; मृदा कार्डाचे होणार वितरण

शासनाच्या योजनेसह वैयक्तिक स्तरावरही माती परीक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र नमुना तपासणी प्रक्रियेत काहीसा विलंब होत असल्याने काही शेतकरी खासगी प्रयोगशाळांकडे वळत आहेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 26, 2026 | 02:36 PM
माती परीक्षणातून जमिनीचे आरोग्य मूल्यांकन! २७ हजारांवर शेतकऱ्यांचा सहभाग; मृदा कार्डाचे होणार वितरण

माती परीक्षणातून जमिनीचे आरोग्य मूल्यांकन! २७ हजारांवर शेतकऱ्यांचा सहभाग; मृदा कार्डाचे होणार वितरण

Follow Us
Follow Us:

रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे शेतजमिनीचा पोत बिघडत असून, त्यामुळे शेतमालाच्या उत्पादनात घट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जमिनीचे आरोग्य समजण्यासाठी शासनाकडून माती परीक्षण योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. या उपक्रमांतर्गत २०२५-२६ या वर्षात जिल्ह्यातील तब्बल २७ हजार ६९५ शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचे मृदा परीक्षण करून घेतले आहे. कृषी विभागाच्या जिल्हा मृदा सर्वेक्षण व मृद चाचणी कार्यालयामार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ही प्रक्रिया राबविण्यात येते. शेतकऱ्यांकडून मातीचे नमुने गोळा करून त्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. या तपासणी अहवालातून जमिनीचे रासायनिक, भौतिक व जैविक गुणधर्म स्पष्ट होतात.(फोटो सौजन्य – AI)

कोळसा खाणींमुळे वाढले प्रदूषण! नागरिकांचा श्वास गुदमरतोय; धुळीवर नियंत्रणासाठी हवी ठोस उपाययोजना

जमिनीच्या प्रकारानुसार (भारी, मध्यम व हलकी) खतांचे प्रमाण निश्चित करण्यास या अहवालाची मदत होते. माती परीक्षणामुळे जमिनीतील पोषक घटकांची माहिती मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य उपाययोजना करून जमिनीचा पोत सुधारता येतो. यामुळे उत्पादनक्षमतेत वाढ होण्यास मदत होते. जिल्ह्यात १६ तालुक्यांमधील २६ हजार ९३ शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घेतले असून, याशिवाय ११३९ शेतकऱ्यांनी फळबागांसाठी ४६१ जणांनी सामान्य माती नमुन्यांसाठी, ८ पाणी नमुन्यांसाठी तर २ नमुने सूक्ष्म परीक्षणासाठी तपासणीसाठी दिले आहेत. एकूण मिळून २७ हजार ६९५ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

खासगी माती परीक्षणालाही प्रतिसाद:

शासनाच्या योजनेसह वैयक्तिक स्तरावरही माती परीक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र नमुना तपासणी प्रक्रियेत काहीसा विलंब होत असल्याने काही शेतकरी खासगी प्रयोगशाळांकडे वळत आहेत.माती परीक्षणानंतर शेतकऱ्यांना मृदा कार्ड देण्यात येते. या कार्डमध्ये जमिनीचे आरोग्य व आवश्यक खतांची माहिती दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकासाठी योग्य खत व्यवस्थापन करता येते. यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यासोबतच पीक उत्पादनात वाढ होण्यास मोठी मदत होत आहे.

बाजारात गव्हाचे दर घसरले! आखाती युद्धाचा परिणाम; क्विंटलमागे ६०० रुपयांचा बसतोय फटका

66 कृषी विभागाच्या जिल्हा मृदा व सर्वेक्षण मृद चाचणी कार्यालयातून राष्ट्रीय कृषी विकास योजना राबविली जाते. शेतकऱ्यांकडून मातीचे नमुने घेऊन तपासणी केली जाते. जमिनीचा पोत कळावा, यासाठी माती परीक्षण केले आहे. आता टप्याटप्याने शेतकऱ्यांना मृदा कार्डचे वितरण करण्यात येत आहे, असे मत – मनोजकुमार ढगे, अधीक्षक, कृषी अधिकारी, यवतमाळ तालुका तपासणी यांनी व्यक्त केले आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Soil health assessment through soil testing participation of farmers on 27 thousand distribution of soil card

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • farmer
  • maharshtra
  • Yavatmal

संबंधित बातम्या

अपुऱ्या पावसाचे सणासुदीच्या बाजारपेठेवर सावट! व्यापाऱ्यांना ग्राहकांची प्रतीक्षा; व्यापारवृद्धीच्या आशा पावसावरच
1

अपुऱ्या पावसाचे सणासुदीच्या बाजारपेठेवर सावट! व्यापाऱ्यांना ग्राहकांची प्रतीक्षा; व्यापारवृद्धीच्या आशा पावसावरच

४३ हजार शेतकरी झाले कर्जमुक्त! ३७४ कोटी ३१ लाख रुपये खात्यात जमा; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना
2

४३ हजार शेतकरी झाले कर्जमुक्त! ३७४ कोटी ३१ लाख रुपये खात्यात जमा; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना

जीर्ण इमारतीत ३११ विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! छताची गळती, पोषण आहाराचा तुटवडा; लिपिकाचे पद २० वर्षांपासून रिक्त
3

जीर्ण इमारतीत ३११ विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! छताची गळती, पोषण आहाराचा तुटवडा; लिपिकाचे पद २० वर्षांपासून रिक्त

Amravati News: ज्वारी-बाजरीला उतरती कळा! अमरावतीत सोयाबीन-कापसाचे क्षेत्र; मक्याची १५१ टक्के पेरणी
4

Amravati News: ज्वारी-बाजरीला उतरती कळा! अमरावतीत सोयाबीन-कापसाचे क्षेत्र; मक्याची १५१ टक्के पेरणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.