Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बळीराजा सुखावणार… राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी, तब्बल 36585 कोटींची आर्थिक तरतूद

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारने राज्यातील बळीराजासाठी ३६,५८५ कोटी रुपयांच्या ऐतिहासिक कर्जमाफीची अधिकृत घोषणा केली आहे. या निर्णयामुळे थेट ५६ लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असून, ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 22, 2026 | 01:37 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील बळीराजाला मोठा दिलासा मिळणार आहे. पहिल्याच दिवशी राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येणार आहे. राज्य सरकारने अधिवेशनात ऐतिहासिक कर्जमाफी योजनेसाठी तब्बल ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची प्रचंड आर्थिक तरतूद केली जाणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली होती. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असल्याची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली  होती. नेमकी काय आहे तरतूद समजून घेऊयात.

सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार

शेतकऱ्यांना देण्यात येणारी कर्जमाफी हा राज्य शासनासाठी राजकीय विषय नसून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे साधन आहे. आगामी काळात कोणत्याही निवडणूक नसतानाही राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत 36 हजार 585 कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येणार असून सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. ही राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महिला शेतकऱ्यांना कायदेशीर शेतकरी दर्जा देणारे विधेयक मांडण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक – फडणवीस

मुख्यमंत्री फडणवीस स्पष्ट केलं की, “कर्जमाफी हा कायमस्वरूपी उपाय नसला तरी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तो आवश्यक ठरतो. शेतकरी पुन्हा उभा राहावा आणि त्याला नव्याने कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा व्हावा, यासाठी कर्जमाफीकडे शासन एक महत्त्वाचे साधन म्हणून पाहते”.

शासनाने कर्जमाफीसंदर्भात तज्ज्ञ समिती नेमून या समितीला अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना, तसेच बँकिंग व्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्याची जबाबदारी दिली होती. समितीच्या अहवालाच्या आधारे काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. कर्जमाफीची अंमलबजावणी करताना शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही मंत्र्यांची उपसमिती स्थापन करण्यात आली असून आवश्यक ते बदल करण्याचे अधिकार तिला देण्यात आले आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.

यंदा पाऊस उशिराने

राज्यात यंदा पाऊस उशिराने दाखल झाल्यामुळे आणि एल निनोच्या प्रभावामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. जून महिन्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा सुमारे 80 टक्के कमी पाऊस झाला आहे. विदर्भात 80 टक्के, मध्य महाराष्ट्रात 83 टक्के, कोकणात 86 टक्के तर मराठवाड्यात 69 टक्के पावसाची तूट नोंदवली गेली आहे. काही जिल्ह्यांमध्ये अद्याप पाऊस झालेला नाही.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार 23 जूनपासून कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मात्र विदर्भ आणि मराठवाड्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्वत्र पेरणीयोग्य पावसाची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी घाईने पेरणी करू नये. जमिनीत किमान 100 मिमी पाऊस मुरल्यानंतरच पेरणी करावी. राज्य शासनाकडून सातत्याने हवामान आणि शेतीविषयक सूचना दिल्या जात असल्याने शेतकऱ्यांनी त्यानुसार निर्णय घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

हा मुद्दा अधिवेशनात पहिल्या दिवसी विरोधकांकडून गाजत आहे. सरकार किती लवकर हा निर्णय पास करत शेतकऱ्यांना सुखावतो हे पाहावं लागेल.

Web Title: Maharashtra farmer loan waiver 36585 crore monsoon session 2026 marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 01:16 PM

Topics:  

  • Business News
  • CM Devendra Fadanvis
  • farmer
  • Farmer Crisis
  • Farmer Issue
  • Farmer Loan Waiver
  • Farmer Protest
  • Mansoon session
  • Marathi News

संबंधित बातम्या

Hruta Durgule Aali Mothi Shahani Teaser: चिमुकलीची एक इच्छा आणि बदलणारं संपूर्ण जग! ‘आली मोठी शहाणी’चा ट्रेलर प्रदर्शित
1

Hruta Durgule Aali Mothi Shahani Teaser: चिमुकलीची एक इच्छा आणि बदलणारं संपूर्ण जग! ‘आली मोठी शहाणी’चा ट्रेलर प्रदर्शित

Tata Sierra Legend Series लाँच; ₹11.99 लाखांपासून किंमत, प्रीमियम फीचर्सचा भर
2

Tata Sierra Legend Series लाँच; ₹11.99 लाखांपासून किंमत, प्रीमियम फीचर्सचा भर

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!
3

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!

Ferrari India : दिल्लीमध्ये रंगणार Ferrariचा थरार! पहिल्यांदाच भारतात ‘Universo Ferrari’; पाहता येणार सुपरकार्सचा जलवा
4

Ferrari India : दिल्लीमध्ये रंगणार Ferrariचा थरार! पहिल्यांदाच भारतात ‘Universo Ferrari’; पाहता येणार सुपरकार्सचा जलवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.