सोलापूर : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील स्वयं सहायता समूहातील महिलांच्या यशोगाथा दृकश्राव्य स्वरुपात लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने राज्यस्तरीय लघुपट व माहितीपट आणि चित्रफित निर्मितीच्या स्पर्धेचे आयोजन दिनांक १ जून ते ३० जून पर्यंत करण्यात आले होते. या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातून ५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. यामधील दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा व परिसरात AVF क्रियेटीव्ह यांनी बचत गटांच्या एकत्रीत कामातून मोठ्या अडचणीवर मात या विषयावरील चित्रफितीस राज्यात तृतीय क्रमांक मिळाला आहे.
सोलापूर जिल्हातील चित्रफितीस राज्य स्तरावरील तृतीय क्रमांक मिळाल्याबद्दल व जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष सोलापूर यांनी विशेष नियोजन केल्यामुळे व स्पर्धेस उत्तम प्रतिसाद मिळवून दिल्याबद्दल मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय बैठकीत ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. सदर प्रमाणपत्र सोलापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा संतोष धोत्रे व जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे यांनी स्वीकारले.
[read_also content=”मुकेश अंबानी यांना धमकी देणाऱ्याला बिहारमधून अटक https://www.navarashtra.com/maharashtra/the-person-who-threatened-mukesh-ambani-was-arrested-from-bihar-nrdm-333235.html”]
सदर स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळाल्याबद्दल जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाचे अभिनंदन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, प्रकल्प संचालक संतोष धोत्रे यांनी केले. यावेळी जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, लेखाधिकारी सुजाता माणगावकर, जिल्हा व्यवस्थापक राहूल जाधव, संतोष डोंबे, भगवान कोरे, मिनाक्षी मडीवळी, अमोल गलांडे, दक्षिण सोलापूर तालुका अभियान व्यवस्थापक शिवाजी वाघमारे, प्रदीप बंगाळे उपस्थित होते.