Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News :सोलापुरात मोठा उद्योग आणणार; तरुणांचे स्थलांतर थांबविण्याचे उदय सामंत यांचे आश्वासन

Solapur News: अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त सोलापूर विद्यापीठात बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोलापूर एमआयडीसीमध्ये मोठा उद्योग आणण्याचे आश्वासन दिले. स्थानिक रोजगाराच्या संधी वाढवून तरुणांचे स्थलांतर थांबविण्यावर भर देण्यात आला.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 06, 2026 | 10:00 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • एमआयडीसीत मोठा उद्योग आणण्याचा निर्धार
  • ‘सोलापूर वृद्धांचे शहर बनू देऊ नका’
  • १४६ कौशल्य अभ्यासक्रम; ३५ हजार विद्यार्थी ऑनलाइन
Solapur News : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील महत्त्वाचा टप्पा असून, अभिजात मराठी हीच आपली खरी ओळख असल्याचे प्रतिपादन उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी त्यांनी सोलापूरच्या औद्योगिक विकासासह विद्यार्थ्यांच्या रोजगाराचा मुद्दाही उपस्थित केला. एमआयडीसीमध्ये मोठा उद्योग आणून पुणे, मुंबई आणि बंगळुरूकडे होणारे तरुणांचे स्थलांतर थांबविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

एमआयडीसीत मोठा उद्योग आणण्याचा निर्धार

सोलापूरच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी एमआयडीसीमध्ये मोठा उद्योग आणणे गरजेचे असल्याचे सामंत यांनी सांगितले. आचारसंहिता संपल्यानंतर विद्यार्थ्यांशी चर्चा करून याबाबत ठोस पुढाकार घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण झाल्यास तरुणांचे मोठ्या शहरांकडे होणारे स्थलांतर कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोलापूरच्या औद्योगिक विकासासाठी शासनाकडून आवश्यक प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

FDA Hits Vaijapur: वैजापूरमध्ये FDAचा दणका! नॅचरल डेअरीचा परवाना निलंबित; पनीर-तुपाचा साठा नष्ट

‘सोलापूर वृद्धांचे शहर बनू देऊ नका’

खासदार ज्योती वाघमारे यांनीही सोलापूरच्या औद्योगिक मागणीचा मुद्दा जोरदारपणे मांडला. रोजगाराच्या संधींच्या अभावामुळे तरुण पुणे, मुंबई आणि अन्य मोठ्या शहरांकडे स्थलांतरित होत आहेत. परिणामी सोलापूर ‘वृद्धांचे शहर’ बनत चालल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

एमआयडीसीमध्ये तातडीने मोठा उद्योग सुरू करण्यासाठी उद्योगमंत्र्यांनी विशेष पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. स्थानिक तरुणांना रोजगार मिळाल्यास शहराच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.

Maharashtra Drought Relief: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दुष्काळी मदत देण्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश

१४६ कौशल्य अभ्यासक्रम; ३५ हजार विद्यार्थी ऑनलाइन

कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी विद्यापीठातील विविध उपक्रमांची माहिती दिली. विद्यापीठात सध्या १४६ कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू असून, सुमारे ३५ हजार विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने जोडले गेल्याचे त्यांनी सांगितले. या अभ्यासक्रमांच्या विस्तारासाठी ‘स्कूल ऑफ स्किल डेव्हलपमेंट’ इमारतीचा प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी त्यांनी सामंत यांच्याकडे केली.

मराठी विभागातील संशोधनासाठी प्राध्यापक पदांना मंजुरी मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याच्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना सामंत यांनी कुलगुरूंना दिल्या. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर भाषेची सभ्यता आणि संस्कार जपावेत तसेच राजकीय स्वार्थासाठी स्वतःचा वापर होऊ देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.

 

 

Web Title: Solapur news major industry to be brought to solapur uday samant promises to halt youth migration cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 10:00 PM

Topics:  

  • Marathi News
  • Solapur News

संबंधित बातम्या

Solapur News :१६० हरकतींवर मंगळवारी सुनावणी; तीन तालुक्यांतील संस्थांवर प्रशासनाची नजर
1

Solapur News :१६० हरकतींवर मंगळवारी सुनावणी; तीन तालुक्यांतील संस्थांवर प्रशासनाची नजर

Hollywood News :$81 अब्जचा सौदा; Paramount- Warner Bros. एकत्र, Skydanceचा दबदबा
2

Hollywood News :$81 अब्जचा सौदा; Paramount- Warner Bros. एकत्र, Skydanceचा दबदबा

Maharashtra News :भूजल वाढीसाठी जलसंधारणावर भर द्या; हसन मुश्रीफ यांचे प्रशासनाला निर्देश
3

Maharashtra News :भूजल वाढीसाठी जलसंधारणावर भर द्या; हसन मुश्रीफ यांचे प्रशासनाला निर्देश

World News :युरोपच्या कार बाजाराला चीनचा धक्का;व्यापारयुद्धासाठी नवा डाव
4

World News :युरोपच्या कार बाजाराला चीनचा धक्का;व्यापारयुद्धासाठी नवा डाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.