Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur DCC Bank Election : ‘माझ्याच काळात बँकेला लायसन्स मिळवून दिले’; रणजितसिंह मोहिते-पाटलांचा दावा

Solapur DCC Bank Election : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलने प्रचाराचा जोर वाढवला आहे. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी आपल्या कार्यकाळातील कामांचा पाढा वाचला.

  • By विवेक
Updated On: Nov 22, 2026 | 09:04 PM
satara dcc bank prachar

satara dcc bank prachar

Follow Us
Follow Us:
  • सोलापूर डीसीसी बँक निवडणुकीत स्वाभिमानी पॅनलचा प्रचार जोरात
  • रणजितसिंह आणि धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक
  • १,५०० कोटींच्या ठेवी दुप्पट केल्या – रणजितसिंह मोहिते पाटील
 

सोलापूर शहर प्रतिनिधी : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलने प्रचाराला वेग दिला आहे. रविवार, दि. २२ रोजी सोलापुरातील एका हॉटेलच्या सभागृहात माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनलची विचारविनिमय बैठक पार पडली. (Solapur DCC Bank Election)

यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी आपल्या चेअरमनपदाच्या कार्यकाळातील कामकाजाचा आढावा मांडला. आपण चेअरमन असताना कोणत्याही खासगी संस्थेला एक रुपयाचेही कर्ज दिले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, अक्कलकोट तालुक्यात अलीकडील काळात झालेल्या १० कोटी रुपयांच्या कर्जवाटपावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

“१,५०० कोटींच्या ठेवी दुप्पट केल्या”

२००४ मध्ये आपल्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळाच्या कार्यकाळात बँकेला लायसन्स मिळवून दिल्याचे सांगून ते म्हणाले, “सध्या आम्ही कोणावरही टीका-टिप्पणी न करता केवळ बँकिंगच्या मुद्द्यांवर प्रचार करीत आहोत. आमच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात बँकेच्या १,५०० कोटी रुपयांच्या ठेवी दुप्पट केल्या. शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यासाठी कर्जपत्रक काढण्यात आले होते. नवीन-जुने कर्जवाटप बंद ठेवल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सव्वादोन लाख शेतकऱ्यांना ६०० कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे,” असे त्यांनी सांगितले.

Nashik Politics : नाशिक महापालिकेत स्वीकृत सदस्य निवडीचा वाद; नवीन शहराध्यक्षांच्या नियुक्तीची चर्चा

बँकेत जबाबदार व्यक्तींना संचालक म्हणून पाठवून शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध योजना राबविण्याचा अजेंडा त्यांनी यावेळी मांडला. पॅनलच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

पॅनलचे उमेदवार अमोल शिंदे म्हणाले, “जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी मिळेल, असे कधी वाटले नव्हते. मोहिते-पाटील बंधू स्वतः उमेदवार नसतानाही कार्यकर्त्यांचा पॅनल निवडून आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पॅनलचे सर्व उमेदवार निवडून येतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या बैठकीस डॉ. अनिकेत देशमुख, अमोल शिंदे, अस्मिता गायकवाड, वसंतनाना देशमुख, चेतन नरोटे, महेश गादेकर, प्रताप चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख अमर पाटील, माजी महापौर आरिफ शेख, संजय हेमगड्डी, राजू सुपाते, प्रवीण डोंगरे, भारत जाधव, ज्ञानेश्वर सपाटे आदींसह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

८८७ कोटींच्या कर्जाच्या ऑडिटचा मुद्दा उपस्थित

यावेळी स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलचे उमेदवार ॲड. दत्तात्रय खडतरे यांनी बोत्रे-पाटील यांच्या कारखान्यांना दिलेल्या ८८७ कोटी रुपयांच्या कर्जाचा मुद्दा उपस्थित केला. या कर्जवाटपाचे ऑडिट करण्याचा इशारा देत त्यांनी निवडणूक निधीबाबतही प्रश्न उपस्थित केले. गोरे इंग्रज गेले आणि देशी गोरे आले, अशी टीका करत बँकेत आमचीच सत्ता येईल आणि विरोधी गटातील चार उमेदवार आमच्याकडे येतील, असा दावाही त्यांनी केला.

एकीकडे जुन्या कामांचा लेखाजोखा, तर दुसरीकडे कोट्यवधींच्या कर्जाच्या ऑडिटची मागणी, यामुळे सोलापूर डीसीसी बँकेची निवडणूक आता चांगलीच रंगात आली आहे.

Satara News : ‘शिवेंद्रसिंहराजेंवर बोलाल तर खबरदार!’ जावळीत महायुतीला घरचा आहेर,जागावाटपाच्या राजकारणावर सौरभ शिंदेंचा थेट निशाणा

💡

Frequently Asked Questions

  • Que: सोलापूर डीसीसी बँकेच्या निवडणुकीत कोणत्या पॅनलने प्रचार सुरू केला आहे?

    Ans: स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलने निवडणुकीच्या प्रचाराला वेग दिला असून, रणजितसिंह मोहिते-पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विचारविनिमय बैठक घेण्यात आली.

  • Que: रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी बँकेबाबत काय दावा केला?

    Ans: २००४ मध्ये आपल्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळाच्या काळात बँकेला लायसन्स मिळवून दिले आणि पाच वर्षांच्या कार्यकाळात बँकेच्या १,५०० कोटी रुपयांच्या ठेवी दुप्पट केल्या, असा दावा त्यांनी केला.

  • Que: ८८७ कोटींच्या कर्जाबाबत कोणी ऑडिटची मागणी केली?

    Ans: स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलचे उमेदवार ॲड. दत्तात्रय खडतरे यांनी बोत्रे-पाटील यांच्या कारखान्यांना दिलेल्या ८८७ कोटी रुपयांच्या कर्जाच्या ऑडिटची मागणी केली.

Web Title: Solapur dcc bank election ranjitsinh mohite patil dattatray khadtare vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 09:04 PM

Topics:  

  • Dhairyashil Patil
  • District Bank Election
  • Solapur News
  • Solapur Politics

संबंधित बातम्या

Solapur District Bank Election : सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीचं रणशिंग फुंकलं! मोहिते पाटलांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ
1

Solapur District Bank Election : सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीचं रणशिंग फुंकलं! मोहिते पाटलांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ

Sairat well dried up : संपूर्ण महाराष्ट्राला प्रेमाचं याड लावणारी विहीर आटली; ‘सैराट’मधील प्रसिद्ध विहिरीने गाठला तळ
2

Sairat well dried up : संपूर्ण महाराष्ट्राला प्रेमाचं याड लावणारी विहीर आटली; ‘सैराट’मधील प्रसिद्ध विहिरीने गाठला तळ

Solapur News: ऊसदरावरून शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांमध्ये मतभेद कायम; जयकुमार गोरेंच्या बैठकीतही तोडगा निघेना
3

Solapur News: ऊसदरावरून शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांमध्ये मतभेद कायम; जयकुमार गोरेंच्या बैठकीतही तोडगा निघेना

MSEDCL Launches Abhay Yojana: बारामती परिमंडलातील २.८१ लाख ग्राहकांसाठी महावितरणची ‘अभय योजना २०२६-२७’ लागू
4

MSEDCL Launches Abhay Yojana: बारामती परिमंडलातील २.८१ लाख ग्राहकांसाठी महावितरणची ‘अभय योजना २०२६-२७’ लागू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.