Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News: अचानक हृदयाची धडधड थांबली! सीपीआरमुळे ५५ वर्षीय रुग्णाला मिळाले नवे जीवन

Solapur News: सोलापुरातील हृदयम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ओपीडीत ५५ वर्षीय रुग्णाला तीव्र हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांच्या तत्परतेने सीपीआर आणि डिफिब्रिलेशन करून प्राण वाचवले.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 10, 2026 | 01:07 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ५५ वर्षीय रुग्णाला ओपीडीतच हृदयविकाराचा झटका
  • सीपीआर आणि डिफिब्रिलेशनने वाचले प्राण
  • डॉक्टरांच्या तत्परतेने वाचले प्राण
Solapur News: शहरातील रेल्वेलाईन परिसरातील हृदयम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या ५५ वर्षीय रुग्णाला ओपीडीतच अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याची घटना घडली. छातीत तीव्र वेदना होत असल्याने हा रुग्ण उपचारासाठी आला होता. मात्र, तपासणी सुरू होण्यापूर्वीच त्याची प्रकृती अचानक गंभीर झाली.

रुग्णाला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे लक्षात येताच ओपीडीतील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपत्कालीन उपचार सुरू केले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून काही सेकंदांतच रुग्णाला सीपीआर देण्यास सुरुवात करण्यात आली.

हृदयम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर शैलेश पाटील यांनी स्वतः पुढाकार घेत रुग्णाला सीपीआर दिला. त्यानंतर आवश्यकतेनुसार डिफिब्रिलेशनद्वारे विद्युत धक्का देण्यात आला. पुढील आवश्यक आपत्कालीन उपचारही तातडीने सुरू करण्यात आले. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे रुग्णाला वेळेत उपचार मिळाले आणि त्यांचे प्राण वाचविण्यात यश आले.

काही सेकंदांची तत्परता ठरली निर्णायक

तीव्र हृदयविकाराच्या झटक्याच्या परिस्थितीत सुरुवातीचा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो. अशा वेळी तातडीने सीपीआर सुरू करणे आणि गरजेनुसार डिफिब्रिलेशनसह पुढील आपत्कालीन उपचार करणे निर्णायक ठरू शकते. या घटनेतही उपचार सुरू करण्यात झालेला विलंब टाळल्याने रुग्णाला वेळेत वैद्यकीय मदत मिळाली.

Buldhana News: हॉर्न वाजविल्याचा राग तिघांवर जीवघेणा हल्ला; ६ जणांविरुद्ध गुन्हा; हातणी गावातील घटना

वेळीच उपचार मिळणे आवश्यक

हृदयविकाराचा झटका कोणत्याही वेळी आणि कोणत्याही ठिकाणी येऊ शकतो. अशा परिस्थितीत रुग्णाला तातडीने योग्य प्रथमोपचार आणि वैद्यकीय उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. आपत्कालीन परिस्थितीत सीपीआरचे प्रशिक्षण आणि योग्य वेळी केलेली कृती रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी निर्णायक ठरू शकते, हे या घटनेतून अधोरेखित झाले.

रुग्णावर तातडीने उपचार करणारे डॉक्टर शैलेश पाटील आणि ओपीडीतील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाचे आणि तत्परतेचे कौतुक होत आहे.

Nagpur : मनपाचा ‘तो’ निर्णय कागदावरच , सी आणि डी कचरा व्यवस्थापनाचा दावा फोल; प्रशासनाचे दुर्लक्ष !

Web Title: Solapur news patient suffers heart attack in opd cpr and defibrillation save his life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 01:07 PM

Topics:  

  • heart attack
  • Hospital
  • Solapur News

संबंधित बातम्या

दिवसाला ६० सिगारेटची सवय! नाना पाटेकरांनी असे सोडले स्मोकिंगचे व्यसन; स्वतःच सांगितला होता ‘तो’ अनुभव
1

दिवसाला ६० सिगारेटची सवय! नाना पाटेकरांनी असे सोडले स्मोकिंगचे व्यसन; स्वतःच सांगितला होता ‘तो’ अनुभव

Solapur News: तेलंगणाहून नाणीजधामकडे निघाली ‘वसुधरा दिंडी’; सोलापुरात भाविकांचे भव्य स्वागत!
2

Solapur News: तेलंगणाहून नाणीजधामकडे निघाली ‘वसुधरा दिंडी’; सोलापुरात भाविकांचे भव्य स्वागत!

Heart Health: वयाची 60 वर्षे ओलांडली? कार्डियाक अरेस्टचा धोका कमी करण्यासाठी ज्येष्ठांनी ‘या’ पद्दतीने घ्यावी आरोग्याची काळजी
3

Heart Health: वयाची 60 वर्षे ओलांडली? कार्डियाक अरेस्टचा धोका कमी करण्यासाठी ज्येष्ठांनी ‘या’ पद्दतीने घ्यावी आरोग्याची काळजी

Nana Patekar Passed Away: नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन! हार्ट अटॅक येण्याआधी दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे
4

Nana Patekar Passed Away: नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन! हार्ट अटॅक येण्याआधी दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.