
(फोटो सौजन्य- चॅट जीपीटी)
इच्छुक वाहनधारकांनी ११ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत नवीन नोंदणी विभागात अर्ज साद करावेत. नवीन नोंदणी मालिका सुरू करताना RTO कार्यालयात गर्दी होऊ नये, यासाठी ही प्रक्रिया नियोजित पद्धतीने राबवण्यात येत आहे.
पसंतीच्या क्रमांकासाठी विहित नमुन्यातील अर्जासोबत डीडी, पत्त्याचा पुरावा, आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक, ओळखपत्र आणि पॅनकार्डच्या साक्षांकित प्रती साद करणे आवश्यक आहे.
डीडी हा ‘उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर’ यांच्या नावे राष्ट्रीयकृत किंवा अनुसूचित बँकेचा असावा. अन्य कोणत्याही नावाने काढलेला डीडी स्वीकारला जाणार नसल्याचे RTO प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
RTO Challan च्या नावाखाली सायबर जाळे; APK फाईल उघडताच खात्यातून 7.63 लाख लंपास
एकदा राखीव केलेला नोंदणी क्रमांक नंतर बदलता येणार नाही. क्रमांक राखीव केल्याच्या तारखेपासून १८० दिवसांच्या आत वाहन नोंदणीसाठी साद करणे बंधनकारक आहे.
या मुदतीत वाहन नोंदणीसाठी साद न केल्यास राखीव केलेला क्रमांक आपोआप रद्द होईल. तसेच त्यासाठी भरलेले शुल्क सरकारजमा केले जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
पसंतीच्या क्रमांकासाठी लिलावाची प्रक्रियाही राबवण्यात येणार आहे. लिलावासाठीचा डीडी १२ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेपर्यंत सीलबंद लिफाफ्यात साद करावा लागेल.
डीडीची रक्कम विहित शुल्कापेक्षा किमान ३०० रुपये अधिक असणे आवश्यक असून, डीडीची मुदत किमान एक महिन्याची असावी. १२ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पात्र अर्जदारांसमोर सीलबंद लिफाफे उघडण्यात येतील.
विहित शुल्कापेक्षा सर्वाधिक रकमेचा डीडी साद करणाऱ्या अर्जदाराला संबंधित पसंतीचा नोंदणी क्रमांक देण्यात येणार आहे. त्यामुळे आकर्षक नंबर मिळवू इच्छिणाऱ्या वाहनधारकांसाठी ‘MH-13-FF’ मालिकेत विशेष संधी उपलब्ध झाली आहे.