Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pandharpur Ashadhi Wari 2026: ‘वारीत सुविधा, सेवेत कसूर नाही! साडेचार कोटींच्या कामांना जिल्हा परिषदेची ऐतिहासिक मंजुरी

आगामी आषाढी वारीसाठी सोलापूर जिल्हा परिषदेने पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींसाठी ४.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. वारकऱ्यांसाठी फुट मसाजर, जर्मन हँगर निवारा केंद्र आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 25, 2026 | 09:07 PM
Pandharpur Ashadhi Wari 2026: ‘वारीत सुविधा, सेवेत कसूर नाही! साडेचार कोटींच्या कामांना जिल्हा परिषदेची ऐतिहासिक मंजुरी
Follow Us
Follow Us:
  • ‘वारीत सुविधा, सेवेत कसूर नाही!
  • साडेचार कोटींच्या कामांना जिल्हा परिषदेची ऐतिहासिक मंजुरी
पंढरपूर, (वा.): आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने मोठा निर्णय घेत विविध विकासकामांना मंजुरी दिली आहे. पंढरपूर येथे झालेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींसाठी तब्बल साडेचार कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली. यामध्ये ग्रामपंचायतींच्या अनुदानात एक कोटी रुपयांची वाढ करण्यात आल्याने पालखी मार्गावरील गावांना मोठा दिलासा मिळाला आहे. पंढरपूर येथील स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य होते.

यावेळी उपाध्यक्ष इंद्रजित पवार, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार, समाजकल्याण समितीच्या सभापती संस्कृती सातपुते, कृषी व संवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अमृता वाघे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड, कार्यकारी अभियंते संतोष कुलकर्णी, प्रसाद काटकर, नरेंद्र खराडे तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल जाधव, अधीक्षक तांबोळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वसाधारण सभेच्या व्यवस्थेचे उत्कृष्ट नियोजन केल्याची दखलही यावेळी घेण्यात आली. सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ग्रामविकास विभागामार्फत वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या भरघोस निधीबद्दल अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, पक्ष नेत्या रश्मी बागल, जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज माने, व्यंकटेश भालके, अतुल पवार आणि अजिनाथ देशमुख यांनी अभिनंदन करून आभार मानले. आषाढी वारीदरम्यान लाखो वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधी समन्वयाने काम करत असून सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

ग्रामपंचायतींना वाढीव अनुदान

पालखी मार्गावरील सांगोला, माढा, बार्शी, मंगळवेढा तसेच उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींना वाढीव अनुदान देण्याची मागणी सदस्यांनी सभागृहात केली. यावर उत्तर देताना मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी पूर्वी ८१ ग्रामपंचायतींना दिल्या जाणाऱ्या ३ कोटी ५० लाख रुपयांच्या अनुदानात एक कोटी रुपयांची वाढ करण्यात आल्याचे सांगितले. तसेच आणखी १० ग्रामपंचायतींचा पालखी मार्गातील गावांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

Vitthal Katha: पंढरपुरात विठ्ठलाचे आगमन, कसे पडले नाव? जाणून घ्या कथा

वारकऱ्यांसाठी सुविधा वाढणार

ग्रामपंचायत विभागामार्फत वारकरी स्वागत कमानी, पायांना आराम देणारे फुट मसाजर, मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्र (जर्मन हँगर), शौचालये, स्नानगृहे, पालखी तळांना जोडणारे रस्ते, पिण्याच्या पाण्याचे टँकर, औषध खरेदी, मोबाईल चार्जिंग स्टेशन आणि स्वच्छता व्यवस्थेसह विविध सुविधांच्या कामांना सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली.

सीईओ कुशल जैन यांच्या नियोजनाचे कौतुक

वारीपूर्व तयारीसाठी निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण करून विकासकामांना गती दिल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या कार्याचे सदस्यांनी विशेष कौतुक केले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनीही सर्व कामांच्या नियोजनावर बारकाईने लक्ष ठेवल्याचे नमूद करण्यात आले. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने पिण्याच्या पाण्याच्या टँकरची निविदा प्रक्रिया सर्वप्रथम पूर्ण केल्याबद्दल कुशल जैन यांनी कार्यकारी अभियंता प्रसाद काटकर आणि त्यांच्या संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले.

आ. राजेंद्र राऊत यांच्या अभिनंदनाचा ठराव

विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल आ. राजेंद्र राऊत यांच्या अभिनंदनाचा ठराव जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज माने यांनी सभागृहात मांडला. अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार आणि सर्व सदस्यांनी हा ठराव एकमताने मंजूर करून राऊत यांचे अभिनंदन केले.

विठ्ठल मूर्ती लेपनाचा मार्ग मोकळा; न्यायालयाने स्थगितीची मागणी फेटाळली. 23-24 जूनला लेपन प्रक्रिया निश्चित

Web Title: Solapur zp approves 4 point 5 crore fund for pandharpur ashadhi wari palkhi route

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 09:07 PM

Topics:  

  • Ashadhi Wari 2026
  • pandharpur
  • Solapur

संबंधित बातम्या

Ganesh Festival : बाप्पाच्या उत्सवातून माणुसकीची सेवा! १२१ नागरिकांची आरोग्य तपासणी, रक्तदानाचा संदेश
1

Ganesh Festival : बाप्पाच्या उत्सवातून माणुसकीची सेवा! १२१ नागरिकांची आरोग्य तपासणी, रक्तदानाचा संदेश

Solapur Viral Video : ९ एकर जमीन नावावर करूनही मुलाकडून आई-वडिलांचा छळ; सोलापुरात धक्कादायक प्रकार
2

Solapur Viral Video : ९ एकर जमीन नावावर करूनही मुलाकडून आई-वडिलांचा छळ; सोलापुरात धक्कादायक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.