फोटो सौजन्य- pinterest
जरी पृथ्वीवर भगवानांचे असंख्य मंदिर आणि मूर्ती आहेत तरी त्यामध्ये भगवानांच्या विविध मुद्रा आणि लीला वेगवेगळी रुप दर्शविली आहेत. कुठेतरी रामरमणाच्या रुपात त्यांची एक लहान मूर्ती आहे तर कुठेतरी द्वारकेत राजाच्या रुपात विराजमान आहे. असं म्हटलं जातं जशी माणसांची भावना तशी देवाची प्रतिमा. 25 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे आणि आता पुंढरपुराच्या दिशेने भक्तांची वाटचाल सुरू झाली आहे. विठुरायाच्या भक्तीने वारकरी निघाले आहे. पण आजही विठुराय एकच विठेवर का उभा आहे तुम्हाला माहिती आहे का? याची कथा जाणून घेऊया
सहाव्या शतकामध्ये महाराष्ट्रातील पंढरपूर येथे पुंडलिक नावाचा एक भक्त जन्मला. पुंडलिकांची आपल्या आई वडिलांवर आणि आपले आराध्य दैवत भगवान श्रीकृष्ण यांच्यावर असीम भक्ती होती. भक्त पुंडलिक हा एक अतिशय साधा, गोड आणि मनमिळावू व्यक्ती होता आणि भगवान श्रीकृष्णांना त्यांचा स्वभाव खूप आवडत असे. भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होऊन त्याला दर्शन देण्यासाठी दारात आले. मात्र त्यावेळी पुंडलिक आई वडिलांच्या सेवेत लीन होता. पुंडलिका बघ बाळा मी तु्ला भेटायला आलो आहे असं भगवंताने त्याला म्हटलं. मात्र त्यावेळी पुंडलिक आपल्या भक्ताचे पाय चोळत होता. तो भगवंताला म्हणाला, हे भगवंता मी सध्या माझ्या वडिलांची सेवा करण्यात व्यस्त आहे. त्यामुळे तुम्हाला थोडा वेळ थांबाव लागेल तोपर्यंत कृपा करून या विठेवर उभं राहून वाट पाहा.
देवानेही पुंडलिकाच्या आई वडिलांच्या करत असलेल्या सेवेचा आदर केला आणि त्या विठेवर न संकोचता उभा राहिला. कंबरेवर दोन्ही हात ठेवून देव एका विठेवर उभा राहिला आणि रुक्मिणीसुद्धा त्या विठेवर येऊन उभी राहिली. वडिलांची सेवा पूर्ण झाल्यावर पुंडलिकांने मागे वळून पाहिले तेव्हा त्याला दिसलं भगवंताने आधीच एका मूर्तीच रुप धारण केलं आहे. पुंडलिकांने ती मूर्ती आपल्या घरीच स्थापित केली आणि तिची सेवा करण्यास सुरुवात केली. विठेवरच उभा असल्यामुळे भगवंतांना विठ्ठल असं नाव पडलं.
आजही आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो भक्त भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी प्रवेश करतात. तसंच पंढरपूरला पोहोचल्यावर मंदिरात जाण्याआधी पुंडलिक दर्शन घेण्याचीही प्रथा आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: पौराणिक कथेनुसार भक्त पुंडलिकाच्या अखंड मातृ-पितृसेवेने प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्ण स्वतः त्याला दर्शन देण्यासाठी पंढरपुरात आले. पुंडलिकाने विट अर्पण केल्यावर भगवान त्या विटेवर उभे राहिले, अशी श्रद्धा आहे.
Ans: एक मतानुसार 'विटेवर उभा असलेला देव' म्हणून 'विठ्ठल' किंवा 'विठोबा' हे नाव प्रचलित झाले. या नावामागे विविध पौराणिक आणि भाषिक मतेही सांगितली जातात.
Ans: पंढरपूर हे भगवान विठ्ठल-रुक्मिणी यांचे प्रमुख तीर्थक्षेत्र असून वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान मानले जाते. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात.






