Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News : पावसाची संथ गती, टंचाईची तीव्रता कायम! पेरण्यांची गतीही चांगली मंदावली

बुलढाणा जिल्ह्यात मान्सूनचे उशिरा आगमन आणि अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या असून पाणीटंचाईची तीव्रता कायम आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 30, 2026 | 07:41 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

Buldhana News : जिल्ह्यात यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झाल्याने जून महिना संपत आला तरी अपेक्षित पावसाची नोंद झालेली नाही. अपुऱ्या पावसामुळे पाणीटंचाईची तीव्रता कायम असून खरीप हंगामातील पेरण्यांचाही वेग मंदावला आहे. पावसाअभावी शेतकरी आणि नागरिक दोघांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Maharashtra Rain Alert : आता नुसता धो धो पाऊस बरसणार! राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

शनिवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी ७४ मिमी पावसाची नोंद झाली असून, हे जिल्ह्याच्या सरासरी वार्षिक पर्जन्यमानाच्या अवघ्या ९.७१ टक्के आहे. मोताळा तालुक्यात ९४ मिमी (१३.२५ टक्के), जळगाव जामोदमध्ये ९५ मिमी (१३.४६ टक्के), मेहकरमध्ये ९४.५ मिमी (११.२७ टक्के), बुलढाण्यात ८६.४ मिमी (१०.०४ टक्के), नांदुरात ७५.४ मिमी (१०.१० टक्के) आणि शेगावमध्ये ६९.९ मिमी (१०.२४ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. इतर तालुक्यांतील स्थितीही समाधानकारक नसल्याचे चित्र आहे.

यंदा जिल्ह्यात सुमारे साडेसात लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरण्यांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, पुरेसा पाऊस न झाल्याने लाखो हेक्टरवरील पेरण्या अद्याप रखडल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी झालेल्या तुरळक पावसावर विश्वास ठेवून पेरण्या सुरू केल्या असल्या, तरी पावसाचा खंड पडल्यास पिकांवर संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, शेतीच्या कामांना सुरुवात झाल्यामुळे ग्रामीण भागात मजुरांची मागणी वाढली आहे. त्यामुळे मजुरीचे दर वाढले असून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील (मनरेगा) मजुरांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. जूनच्या पूर्वार्धात सुमारे २१ हजार मजूर मनरेगावर कार्यरत होते. सध्या ही संख्या १३ ते १४ हजारांपर्यंत घसरली आहे.

जिल्ह्यातील पाणीटंचाई अद्याप गंभीरच आहे. सध्या ४८ गावांमध्ये ५२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून १ लाख १५ हजार ५४७ नागरिकांची तहान टँकरच्या माध्यमातून भागवली जात आहे. तसेच २५२ गावांमध्ये २८४ अधिग्रहित खासगी विहिरींमधून पाणीपुरवठा सुरू आहे. येत्या काही दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis : ‘एल निनो’च्या संभाव्य संकटावर सरकार सज्ज; जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर पूर्ण करा : मुख्यमंत्री फडणवीस

अपुऱ्या पावसाचा परिणाम जिल्ह्यातील ५१ लहान-मोठ्या धरणांवरही झाला आहे. संततधार पाऊस आणि नदी-नाल्यांना पूर न आल्याने धरणांतील जलसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्याची स्थिती चिंताजनक असून सर्वांच्या नजरा आता दमदार पावसाकडे लागल्या आहेत.

Web Title: Sluggish pace of rainfall severity of the shortage persists

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 07:41 PM

Topics:  

  • buldhana news
  • Monsoon News

संबंधित बातम्या

ऑक्टोबर सुरु होताच अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पूर्व भारतातील भागांत गारपीटीचीही शक्यता
1

ऑक्टोबर सुरु होताच अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पूर्व भारतातील भागांत गारपीटीचीही शक्यता

Buldhana: उद्योगपतींचे कर्ज माफ, मग शेतकऱ्यांचे पुनर्गठन का? खासदार अरविंद सावंत यांचा सवाल; दुष्काळ मदतीवरून शिवसेना आक्रमक
2

Buldhana: उद्योगपतींचे कर्ज माफ, मग शेतकऱ्यांचे पुनर्गठन का? खासदार अरविंद सावंत यांचा सवाल; दुष्काळ मदतीवरून शिवसेना आक्रमक

Buldhana: ३० टन कांद्याचा ट्रक पळवणारे गजाआड, ‘समृद्धी’वर चालकाला केली होती मारहाण; ट्रक अन् गुन्ह्यातील कार जप्त
3

Buldhana: ३० टन कांद्याचा ट्रक पळवणारे गजाआड, ‘समृद्धी’वर चालकाला केली होती मारहाण; ट्रक अन् गुन्ह्यातील कार जप्त

बुलढाण्यात १३ तालुके दुष्काळग्रस्त, शेतकऱ्यांना विविध सवलतींचा दिलासा; पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश
4

बुलढाण्यात १३ तालुके दुष्काळग्रस्त, शेतकऱ्यांना विविध सवलतींचा दिलासा; पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.