Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्याच्या रिंगरोड प्रकल्प भूसंपादनाला वेग

  • By युवराज भगत
Updated On: May 22, 2024 | 09:48 PM
Pune Ring Road Project

Pune Ring Road Project

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) प्रस्तावित केलेल्या रिंगरोडच्या पूर्व भागातील हवेली आणि खेड तालुक्यातील १५ गावांमधील जमिनींच्या संपादनाचे निवाडे जाहीर करण्यात आला आहेत. त्यामुळे या प्रकल्पाच्या भूसंपादनाला वेग आला आहे.

रस्ते महामंडळाकडून हाती घेण्यात आलेला प्रकल्प रिंगराेड प्रकल्प पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात ११० मीटर रुंदीचा आणि १७२ किलाेमीटर अंतरांचा आहे. यासाठी पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले असून, पूर्व भागातील मावळ तालुक्यातील ११, खेडमधील १२, हवेलीतील १५, पुरंदरमधील ५ आणि भोरमधील ३ गावांचा समावेश आहे, तर पश्चिम भागातील भोर तालुक्यातील १, हवेलीतील ११, मुळशीतील १५ आणि मावळ तालुक्यातील ६ गावांचा समावेश आहे.

६४४ हेक्टर भूसंपादनाचे काम पूर्ण

पश्चिम मार्गावरील ३४ गावांपैकी ३१ गावांमधील ६४४ हेक्टर भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी २ हजार ९७५ कोटी रुपये मोबदला देण्यात आला आहे. भोर तालुक्यातील ५ गावे वगळून शिवरे गावाचा समावेश झाल्याने या गावातील मूल्यांकनाचे दरनिश्चितीचे काम आचारसंहितेपूर्वी सुरू करण्यात आले होते.

पश्चिम भागाचे बहुतांश भूसंपादन मार्गी
पश्चिम भागाच्या भूसंपादनासाठी यापूर्वीच ‘हुडको’कडून १० हजार कोटींचे कर्ज घेण्यात आले आहे. त्यातून पश्चिम भागाचे बहुतांश भूसंपादन मार्गी लागले आहे. पूर्व भागाच्या भूसंपादनासाठी रस्ते महामंडळाला निधीची गरज होती. त्यानुसार महामंडळाने राज्य सरकारकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात भूसंपादनासाठी तब्बल १० हजार ५१९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

या गावातील निवाडे जाहीर

जिल्हा प्रशासनाकडून या प्रकल्पाच्या पूर्व भागातील खेड आणि हवेली तालुक्यातील जमिनींच्या संपादनाबाबत निवाडे जाहीर करण्यात आले आहेत. हवेली तालुक्यातील मौजे भिवरी, गावडेवाडी आणि वाडेबोल्हाई, तर खेड तालुक्यातील सोळू, निघोजे, मोई, मरकळ, कुरुळी, खालुंब्रे, केळगाव, गोळेगाव, धानोरे, चिंबळी, चऱ्होली आणि आळंदी या गावांचा समावेश आहे. हवेली तालुक्यातील गावांसाठी ६४ कोटी २९ लाख रुपये, तर खेड तालुक्यातील गावांसाठी सुमारे ४७६ कोटी ७२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

Web Title: Speed up land acquisition for punes ring road project nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2024 | 09:48 PM

Topics:  

  • pune news

संबंधित बातम्या

Pimpri Chinchwad : मावळात वनसंपदेची निर्घृण कत्तल; लाकूडतोड्या पुष्पा’वर कठोर कारवाईची मागणी 
1

Pimpri Chinchwad : मावळात वनसंपदेची निर्घृण कत्तल; लाकूडतोड्या पुष्पा’वर कठोर कारवाईची मागणी 

100 व्या साहित्य संमेलनाची नांदी; राज्यभर 99 ठिकाणी ‘साहित्य जागर’
2

100 व्या साहित्य संमेलनाची नांदी; राज्यभर 99 ठिकाणी ‘साहित्य जागर’

प्रशासकीय कारभाराचा हिशोब द्या, सदस्यांची मागणी; जिल्हा परिषदेच्या सभागृहात संतापाचा स्फोट
3

प्रशासकीय कारभाराचा हिशोब द्या, सदस्यांची मागणी; जिल्हा परिषदेच्या सभागृहात संतापाचा स्फोट

जपानमध्ये आता मराठी माणसाचा डंका! शार्प कंपनीत पुण्याच्या उद्योजकाने खरेदी केले ७५% शेअर्स
4

जपानमध्ये आता मराठी माणसाचा डंका! शार्प कंपनीत पुण्याच्या उद्योजकाने खरेदी केले ७५% शेअर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.