Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

100 व्या साहित्य संमेलनाची नांदी; राज्यभर 99 ठिकाणी ‘साहित्य जागर’

आगामी १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची उत्सुकता वाढवणारी नांदी म्हणून राज्यभर ‘साहित्य जागर’ हा व्यापक उपक्रम राबवण्याची घोषणा करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 18, 2026 | 06:19 PM
100 व्या साहित्य संमेलनाची नांदी; राज्यभर 99 ठिकाणी ‘साहित्य जागर’

100 व्या साहित्य संमेलनाची नांदी; राज्यभर 99 ठिकाणी ‘साहित्य जागर’

Follow Us
Follow Us:

पुणे : आगामी १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची उत्सुकता वाढवणारी नांदी म्हणून राज्यभर ‘साहित्य जागर’ हा व्यापक उपक्रम राबवण्याची घोषणा करण्यात आली असून, महाराष्ट्रातील तब्बल ९९ ठिकाणी विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यभर राबवण्यात येणाऱ्या या ‘साहित्य जागर’ उपक्रमामुळे साहित्यप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

या उपक्रमाअंतर्गत फिरते पुस्तक प्रदर्शन, एकदिवसीय किंवा द्विदिवसीय संमेलने, परिसंवाद, साहित्यिकांच्या मुलाखती, अभिवाचन, वाचक मेळावे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. १०० व्या साहित्य संमेलनापूर्वीची ही एक प्रकारे सांस्कृतिक नांदी ठरणार असून, राज्यभर वाचन संस्कृतीला चालना देण्याचा यामागील उद्देश आहे.

मसापच्या नव्या कार्यकारिणीने संमेलनाच्या तयारीला वेग दिला असून, या उपक्रमाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. फिरत्या पुस्तक प्रदर्शनासाठी विशेष बस अधिक अद्ययावत स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मसापच्या विविध शाखांच्या माध्यमातून राज्यभर हे कार्यक्रम राबवले जाणार आहेत.

यासंदर्भात माहिती देताना मसापचे अध्यक्ष योगेश सोमण म्हणाले, “१०० व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राज्यातील प्रत्येक भागात साहित्याचा उत्सव पोहोचावा, या हेतूने ‘साहित्य जागर’ ही संकल्पना राबवली जात आहे. विविध शाखांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, डिसेंबरमध्ये होणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाचनाची आवड वाढवण्यासाठीही हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. या संदर्भात महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी सांगितले की, “फिरत्या पुस्तक प्रदर्शनाच्या माध्यमातून राज्यभर पुस्तक संस्कृतीचा प्रसार करण्यात येईल. तसेच १०० व्या साहित्य संमेलनाचा प्रचार-प्रसारही या उपक्रमातून साधला जाईल. लवकरच अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात येईल.”

हे सुद्धा वाचा : प्रशासकीय कारभाराचा हिशोब द्या, सदस्यांची मागणी; जिल्हा परिषदेच्या सभागृहात संतापाचा स्फोट

Web Title: It has been announced to implement the sahitya jagar initiative across the state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 06:19 PM

Topics:  

  • akhil bhartiya marathi sahitya sammelan
  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

ढोल-ताशांचा नाद अन् ‘गोविंदा रे गोपाळा; पुण्यनगरीत Dahi Handi चा जल्लोष, डीजेमुक्त दहीहंडीला…
1

ढोल-ताशांचा नाद अन् ‘गोविंदा रे गोपाळा; पुण्यनगरीत Dahi Handi चा जल्लोष, डीजेमुक्त दहीहंडीला…

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
2

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
4

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.