नारायणगाव : नारायणगाव (ता. जुन्नर) येथे युवासेना ठाकरे गट कार्यकारिणी सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत इच्छुक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील युवकांचा या पदाधिकारी मुलाखत कार्यक्रमास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी जिल्हाप्रमुख सुरेश भोर, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, विधानसभा संघटक बाबू पाटे, युवासेना कार्यकारिणी सदस्य रुपेश कदम, युवासेना विस्तारक गणेश कवडे, विशाल ससाणे, अमित पेडणेकर, अभिषेक शिर्के, विभागीय सचिव अविनाश बलकवडे, युवासेना सहसचिव विशाल सातव पाटील, योगेश पेडणेकर, उपसचिव मंदार चव्हाण, मुंबई समन्वयक चेतन जाधव, यांसह पक्षातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
[read_also content=”तब्बल ३३ वर्षांनी पुन्हा भरला दहावीचा वर्ग; माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात https://www.navarashtra.com/maharashtra/10th-class-filled-again-after-33-years-alumni-reunion-in-high-spirits-nrdm-335005.html”]
रुपेश कदम यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले प्रास्ताविक युवासेना विस्तारक गणेश कवडे यांनी केले. शिवसेना तालुका प्रमुख खंडागळे यांनी स्वागत केले. तालुका युवा अधिकारी विकी पारखे यांनी संयोजन केले.