श्रीगोंदाच्या तहसीलदारांची वाळू उपशावर कारवाई २० लाखांच्या दोन बोटी उध्वस्त
श्रीगोंदा तालुक्यातील तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी आर्वी व अजनुज येथे सुरू असलेल्या विना परवाना वाळु उपसा करत असलेल्या बोटी रंगेहात पकडून २० लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी आर्वी व अजनुज येथे सुरू असलेल्या विना परवाना वाळु उपसा करत असलेल्या बोटी रंगेहात पकडून २० लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
श्रीगोंदा तालुक्यातील भिमा नदीच्या पात्रात रात्रंदिवस राजरोसपणे अनेक दिवसांपासून वाळु उपसा होत असल्याची माहिती तहसिलदार मिलिंद कुलथे यांना समजली त्यानुसार आज दि. ०६ रोजी तहसीलदार कुलथे व त्यांच्या पथकाने आर्वी व अजनुज या ठिकाणी भीमा नदी पत्रात वाळू उपसा करत असणारी बोट दिसून आली. तहसीलदार यांच्या पथकाला पाहताच बोटी वरील चालक व ईतर कर्मचारी पळून गेले. मात्र तहसीलदार यांनी २० लाख रुपये किमतीच्या दोन्ही बोटी जिलेटीनच्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्या.
श्रीगोंदा तालुका वाळू उपशाबाबतीत जिल्ह्यात प्रसिद्ध आहे वाळू तस्कर वाळू तस्करी करण्यासाठी तहसीलदार व पोलीस अधिकारी यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी वाळु माफियांचे पंटर चौकाचौकात बसुन एकमेकांना खबर देतात . यामुळे अवैध वाळुची वहातुक शहरातुन सुरळीत पणे तालुक्यात होत असते.
अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राधाकृष्ण विखे पाटील व पोलीस अधीक्षक राकेश ओला हजर झाल्यापासून वाळू तस्करीला आळा बसला आहे श्रीगोंदा तालुक्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचा सुद्धा श्रीगोंदा तालुक्यात अवैध धंदे व वाळू तस्करांनी धसका घेतला आहे.
अल्पावधीमध्ये श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी वाळु माफियांची संख्या दिवसेंदिवस वाढु लागलेली आहे. नवीन तरुण मुले वाळू तस्करीकडे वळु लागली आहेत. त्यातूनच गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात उदयास आली आहे. परंतु पोलीस निरीक्षक रामराव ढिकले श्रीगोंद्यात आल्यापासून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी नष्ट केली आहे.
Web Title: Srigonda tehsildars action on sand two boats worth 20 lakhs were destroyed nrab