Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ST Bank Investigation : एसटी बँकेतील कथित गैरव्यवहारांची चौकशी; सहकार विभाग आणि पोलिसांची संयुक्त कारवाई, नेमकं काय घडलं?

ST Bank Investigation : स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेतील कथित आर्थिक आणि प्रशासकीय गैरव्यवहारांच्या तक्रारींची चौकशी होणार आहे. सहकार विभागाने मुंबई जिल्हा उपनिबंधकांना तातडीने चौकशी करून कागदपत्रांसह अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

  • By विवेक
Updated On: Sep 29, 2026 | 08:01 PM
ST Bank

ST Bank

Follow Us
Follow Us:
  • एसटी बँकेतील कथित गैरव्यवहारांच्या तक्रारींची चौकशी करण्याचे आदेश.
  • नोकरभरती, ठेवी, फर्निचर, सॉफ्टवेअर आणि एसी खरेदीवर प्रश्न उपस्थित.
  • मुंबई जिल्हा उपनिबंधकांना कागदपत्रांसह स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे निर्देश
 

मुंबई, 29 सप्टेंबर : स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या एसटी कर्मचाऱ्यांच्या बँकेतील कथित आर्थिक आणि प्रशासकीय गैरव्यवहारांच्या तक्रारींची चौकशी करण्याचे आदेश सहकार विभागाने मुंबई जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत, अशी माहिती मंगळवारी समोर आली. (ST Bank Investigation)

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सहकार आयुक्त कार्यालय, पुणे यांना पत्र पाठवून महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांच्या तक्रारीचा संदर्भ दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

सहकार विभागाने मुंबई जिल्हा उपनिबंधकांना तक्रारीत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांची तातडीने चौकशी करून संबंधित कागदपत्रांसह स्वयंस्पष्ट अभिप्रायाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

पैसे भरले, अर्ज केला; तरीही घर नावावर नाही! गोरेगावच्या मोरारजी मिल म्हाडा संकुलातील रहिवासी वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत

नोकरभरती, ठेवी, फर्निचर, सॉफ्टवेअर आणि एसी खरेदीवर प्रश्न उपस्थित.

तक्रारीनुसार, बँकेतील नोकरभरतीच्या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच बँकेच्या ठेवींमध्ये घट, संचालकांकडून नियमांचे उल्लंघन करून करण्यात आलेला खर्च, सुमारे 50 शाखांमधील फर्निचरची नव्याने खरेदी आणि दुरुस्तीच्या कामातील कथित अनियमितता तसेच नव्याने खरेदी केलेल्या सॉफ्टवेअरबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

बँकेतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना पुन्हा नियुक्त करून त्यांच्यामार्फत कथित गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. याशिवाय न्यायालयीन प्रकरणांमध्ये अवास्तव शुल्क देण्यात आल्याचा तसेच बँकेच्या शाखांसाठी एसी खरेदीत अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या सर्व मुद्द्यांची चौकशी करून संबंधित कागदपत्रांसह अहवाल सादर करण्याच्या निर्देशांमुळे बँकेतील संबंधित आर्थिक आणि प्रशासकीय व्यवहारांची सहकार विभागाकडून छाननी होणार आहे.

तक्रारीतील आरोपांची सखोल चौकशी होऊन दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार बरगे यांनी केली आहे.

ईईई… उंदीर, झुरळं, माश्या; 122 वर्षे जुन्या ऐतिहासिक कॅफेवर FDA ची धाड; कोट्यवधी रुपयांचा भेसळयुक्त साठा जप्त

Web Title: St bank investigation alleged irregularities cooperative department police inquiry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 08:01 PM

Topics:  

  • Bank Fraud
  • MSRTC Bus
  • MSRTC Workers
  • ST News

संबंधित बातम्या

ST News : ‘एसटी तेथे एसटी!’ दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी लालपरीची खास धाव; 100 मिडी बसेस ताफ्यात दाखल होणार
1

ST News : ‘एसटी तेथे एसटी!’ दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी लालपरीची खास धाव; 100 मिडी बसेस ताफ्यात दाखल होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.