Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MSRTC: एसटी चालकांसाठी खूशखबर! रोख रक्कम देवून होणार गौरव; प्रताप सरनाईक यांची महत्त्वाची घोषणा

नव्या बस खरेदीमध्ये १०० मिनी बसेस घेण्यात येणार असून, त्या बसेस प्रामुख्याने डोंगराळ, दुर्गम भागामध्ये चालवण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 07, 2025 | 06:47 PM
एसटी चालकांसाठी खूशखबर! रोख रक्कम देवून होणार गौरव; प्रताप सरनाईक यांची महत्त्वाची घोषणा

एसटी चालकांसाठी खूशखबर! रोख रक्कम देवून होणार गौरव; प्रताप सरनाईक यांची महत्त्वाची घोषणा

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : एसटी चालकांसाठी आनंदाची बातमी असून दरवर्षी विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार असल्यास माहिती परिवार मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. एस टी महामंडळाच्या ३०७ व्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला एस. टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर,कामगार आयुक्त तथा एसटी महामंडळाचे संचालक ह.पि.तुम्मोड रेल्वे बोर्डाचे मुख्य वाणिज्य प्रबंधक तथा एसटी महामंडळाचे संचालक डॉ सुमंत देऊलकर यांच्यासह एसटीचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.

Weather Update: मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी, तर ‘या’ ८ जिल्ह्यांमध्ये गारपीटीचाही अंदाज

मंत्री सरनाईक म्हणाले, वर्षातील 260 दिवस विना अपघात सेवा बजवणाऱ्या चालकांचा रोख रक्कम देऊन १५ ऑगस्ट,२६ जानेवारी व १ मे या राष्ट्रीय सणा दिवशी सत्कार करण्यात येणार आहे. याबरोबरच पाच वर्षे, दहा वर्षे, पंधरा वर्षे ,वीस वर्षे विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचा देखील तितकीच रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात येणार आहे. एसटी महामंडळ गेली ७७ वर्षे महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेला किफायतशीर व सुरक्षित प्रवासी दळणवळणाचे सेवा देत आहे. अपघाताचे अत्यंत अल्प प्रमाण आणि किफायतशीर सेवा यामुळे एसटीने प्रवाशांच्या मनामध्ये विश्वासार्हता निर्माण केली आहे. भविष्यात देखील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी अशा विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचा वेळोवेळी गौरव केला तर निश्चितच ते सजगपणे आणि जबाबदारीने प्रवासी वाहतूक करतील अशी आशा यावेळी मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केली.

२०४ बसस्थानकावर एटीएम सुविधा

बस स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी राज्यातील २०४ बस स्थानकावर एटीएम केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्याबद्दलची निविदा लवकरच प्रसारित करण्यात येत असून राष्ट्रीयकृत बँकेबरोबरच अन्य बॅंकांची एटीएम सुविधा देखील बसस्थानकावर उपलब्ध होणार आहे.

नवीन लालपरी मध्ये ३ बाय २ आसन व्यवस्था

नव्या ३ हजार बसेस खरेदी करण्याची निवेदक प्रक्रियेला या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता दिली. तथापि, या बसेस मध्ये पूर्वीप्रमाणे ३ बाय २ प्रकारची आसन व्यवस्था राहणार आहे. अर्थात,आत्ताच बस पेक्षा तब्बल १५ ते १७ प्रवासी नव्या बसमध्ये बसून प्रवास करतील.

१०० मिनी बसेस घेणार

नव्या बस खरेदीमध्ये १०० मिडी बसेस घेण्यात येणार असून त्या बसेस प्रामुख्याने डोंगराळ, दुर्गम भागामध्ये जिथे सध्याची लालपरी पोहचू शकत नाही, तेथे चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे अतिशय दुर्गम भागातील आदिवासी पाड्यापर्यंत देखील बस सेवा पुरवण्यात महामंडळ सक्षम होईल. त्यामुळे एसटीची सेवा,एसटी (शेड्युल ट्राईब) लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एसटी कटीबद्ध राहणार आहे. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.

“देश के गद्दार हैं…, बुरखा घातलेल्या महिलेने पाकिस्तानच्या झेंड्याचे स्टिकर्स काढले, Video Viral

Web Title: St bus drivers who provide accident free service will be honored with cash transport minister pratap sarnaik maharashtra news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2025 | 06:47 PM

Topics:  

  • msrtc
  • pratap sarnaik
  • st bus

संबंधित बातम्या

एकदाची Tesla कारची झाली डिलिव्हरी ! ‘या’ मंत्र्याच्या हातात पडली पहिल्या Model Y ची चावी
1

एकदाची Tesla कारची झाली डिलिव्हरी ! ‘या’ मंत्र्याच्या हातात पडली पहिल्या Model Y ची चावी

Pune News: एसटी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे स्वप्न अखेर पूर्ण; ‘इतक्या’ जणांना मिळाली पदोन्नती
2

Pune News: एसटी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे स्वप्न अखेर पूर्ण; ‘इतक्या’ जणांना मिळाली पदोन्नती

Pratap Sarnaik : ठाणेकरांना डिसेंबरपासून मेट्रोची भेट मिळण्याची शक्यता
3

Pratap Sarnaik : ठाणेकरांना डिसेंबरपासून मेट्रोची भेट मिळण्याची शक्यता

Eknath Shinde on Manoj Jarange : गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता, सगळी विघ्नं तोच दूर करेल
4

Eknath Shinde on Manoj Jarange : गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता, सगळी विघ्नं तोच दूर करेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.