
*नियोजनाच्या अभावामुळे ऐन उन्हाळी हंगामात एसटीला अपेक्षित उत्पन्न नाही*
उन्हाळ्याच्या सुट्टया ‘लागल्या रे लागल्या’ तर बच्चेकंपनी आपल्या मामाच्या गावी जाण्यासाठी हट्ट धरतात. त्यांना गावी तसेच फिरण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ‘लालपरी’ सज्ज झाली आहे. येत्या १५ एप्रिलपासून ते १५ जूनपर्यंत या कालावधीत उन्हाळी ३७ जादा बसेस सोडण्याचे नियोजन ठाणे एसटी विभागाने केले आहे. त्यानुसार उन्हाळी सुट्टयांच्या कालवधीत ठाणे १ आणि ठाणे २ या आगारसह कल्याण, विठ्ठलवाडी, मुरबाड, शहापूर आणि वाडा या सात एसटी आगारातून नियमित गाड्यांव्यतिरिक्त वरील गाड्यांचे नियोजन केले आहे. तसेच या सोडण्यात येणाऱ्या जादा बसेसमध्ये देखील शासनाने लागू करण्यात आलेल्या सवलतींचा लाभदेखील प्रवाशांना मिळणार असल्याची माहिती एसटी विभागाकडून देण्यात आली.
गणेशोत्सवात आणि दिवाळीच्या सुट्टयांमध्ये ठाणे विभागाचे भारमानात वाढ होण्याबरोबरच उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. राज्यातील विविध भागात जाण्यासाठी विशेष करून पश्चिम महाराष्ट्र, खान्देश आणि मराठवाड्यात जाणाऱ्या नागरिकांसाठी एसटीच्या ठाणे विभागाने चांगली कंबर कसली होती. त्यानंतर आता, उन्हाळ्याच्या सुट्टयांमध्ये गावाकडे अथवा पर्यटन क्षेत्राकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कंबर कसली आहे.
उन्हाळ्याची सुट्टी लक्षात घेऊन प्रवाशांची गर्दी होणाऱ्या मार्गावर १५ एप्रिल २०२५ पासून टप्याटप्याने बसगाड्यांच्या जादा फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाने या काळात राज्यातील विविध मार्गावर ७६४ जादा बस फेऱ्या चालविण्यास मंजुरी दिली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीतील जादा बसगाड्यांचे तिकीट आरक्षण संगणकीय पद्धतीने उपलब्ध करण्यात आले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ, मोबाइल अॅप, एसटी महामंडळाच्या बसस्थानकांवरील आरक्षण केंद्रांवर जादा बसगाड्यांचे आगाऊ आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
ठाणे १ आणि ठाणे २ या आगारसह कल्याण, विठ्ठलवाडी, मुरबाड, शहापूर आणि वाडा या सात एसटी अगगारातून नियमित गाड्यांव्यतिरिक्त ३७ गाड्यांवर नियोजन केल्या या गाड्यांच्या ७४ फेऱ्या अतिरिक्त होणार आहेत. शिवाय ८ हजार २०० किलोमीटर प्रतिदिन गाड्यांचा प्रवास होणार आहे. दरम्यान नियमित गाड्यांमध्ये शासनाच्या असलेल्या सवलती उन्हाळी जादा बसेसमध्ये देखील लागू राहणार असल्याची माहिती ठाणे एसटी विभागाकडून देण्यात आली. ठाण्याच्या वंदना स्थानकावरुन सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत दर एक तासांनी साताराकरीता बसेस सोडण्याचे नियोजनही या विभागाकडुन करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे ठाणे स्वारगेट या मार्गावर देखिल उपरोक्त वेळेत दर अर्धा तासांनी ई-शिवनेरी बसेसच्या फे-या उपलब्ध राहणार आहेत.
ठाणे १ आगार
ठाणे कोल्हापूर, मायणी, चोपडा,
ठाणे २ आगार
■ ठाणे – नारायणगाव, सोलापूर, आटपाडी
■ भिवंडी- शेवगाव, अहमदपूर, चिपळूण, आष्टी
शहापुर आगार
शहापुर चोपडा, साक्री
कल्याण आगार
कल्याण- बामणोली, लोणार, वडूज
मुरबाड आगार
कल्याण धुळे, जाखमेख, शिरूर व्हाया लोणी, शिरूर व्हाया जांबूत, शिरूर व्हाया बेल्हा
विठ्ठल वाडी आगार
बदलापूर – घोट
विठ्ठल वाडी भीमाशंकर दापोली. गुहागर, गुहागर,