राज्य सरकारने तज्ज्ञ समितीमार्फत या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागितला आहे. समितीच्या शिफारशींवर आधारित सुधारणा करण्यात येणार आहे. 18 वर्षे पूर्ण झालेली मुले-मुली शिकाऊ वाहन परवाना घेतात.
कोकणला हा मार्ग जोडला जाणारा आहे. दरे, पिंपरी, निवळी, मुरणी, शिंदी व पुढे खेडला हा मार्ग जोडला जाणार आहे. त्यामुळे कोकणाकडील पर्यटक अधिक प्रमाणामध्ये महाबळेश्वरपर्यंत येण्यास मदत होणार आहे.
पुणे ते मुंबईदरम्यान एसटी महामंडळाच्या सर्वाधिक ई-बस धावतात. त्यामुळे मंडळाला दररोज लाखो रुपयांचा टोल भरावा लागत होता. मात्र, राज्य सरकारच्या टोलमाफीच्या निर्णयामुळे एसटीची लाखो रुपयांची बचत होणार आहे.