Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 24 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MSRTC Land Development: एसटी महामंडळाला मिळणार उत्पन्नाचा नवा स्रोत; पीपीपी तत्त्वावर जमिनींचा विकास करण्याचा निर्णय

MSRTC Land Development : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) अतिरिक्त जमिनींच्या व्यावसायिक विकासाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर या जमिनींचा विकास करण्यासाठी ४९+४९ वर्षांच्या भाडेपट्ट्याला मान्यता देण्यात आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 09, 2026 | 02:27 PM
एसटी महामंडळाला मिळणार उत्पन्नाचा नवा स्रोत; पीपीपी तत्त्वावर जमिनींचा विकास करण्याचा निर्णय

एसटी महामंडळाला मिळणार उत्पन्नाचा नवा स्रोत; पीपीपी तत्त्वावर जमिनींचा विकास करण्याचा निर्णय

Follow Us
Follow Us:
  • एसटीच्या अतिरिक्त जमिनींच्या व्यावसायिक विकासाला वेग
  • 49+49 वर्षांच्या भाडेपट्ट्याला शासनाची मंजुरी
  • पीपीपी तत्त्वावर विकासातून एसटीला भरीव उत्पन्नाचा नवा स्रोत;
  • प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र निविदा बंधनकारक
 

MSRTC Land Development : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताब्यातील अतिरिक्त जमिनींचा अधिकाधिक व्यावसायिक वापर करून महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जमिनींचा सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्त्वावर विकास करण्यास आणि त्यासाठी 49+49 वर्ष असा एकूण ९८ वर्षांपर्यंतचा भाडेपट्टा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे एसटीच्या मालमत्तेतून नियमित व दीर्घकालीन उत्पन्न मिळविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली या प्रक्रियेसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या निर्णयामुळे एसटीच्या आर्थिक बळकटीकरणाला मोठी चालना मिळणार असून, महामंडळाच्या जमिनींचा नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने व्यावसायिक वापर करता येणार आहे.

Raigad News: पनवेलकरांची वाहतूक कोंडीतून सुटका! जय भारत नाक्यावरील अडथळे हटवले, आयुक्त मंगेश चितळे यांची कारवाई

सरकारच्या निर्णयानुसार, एसटी महामंडळाच्या स्वमालकीच्या, भूसंपादनातून संपादित, पूर्वीच्या रोड ट्रान्सपोर्ट विभागाकडून हस्तांतरित, भाडेकरारावरील तसेच बक्षीसपत्राद्वारे प्राप्त अशा विविध प्रकारच्या जमिनींवर PPP अंतर्गत विकास प्रकल्प राबविता येणार आहेत. प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र निविदा काढणे बंधनकारक करण्यात आले आहे.

PPP तत्त्वावरील विकासासाठी अंतिम टप्प्यात असलेल्या व्यवहार्य प्रकल्पांना महाराष्ट्र सार्वजनिक-खाजगी भागीदारी धोरण, २०२६ अंतर्गत काही सवलती देण्याची तरतूदही करण्यात आली आहे. प्रकल्पाच्या निविदा, सवलत करारनामा आणि व्यवहार्य संरचनेसाठी संबंधित समितीची मान्यता घेण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक प्रकल्पाच्या अंतिम निविदेला मुख्यमंत्री स्तरावर मान्यता घेणे बंधनकारक राहणार आहे.

उत्पन्न वाढविण्यासाठी ‘अपफ्रंट प्रीमियम’ मॉडेल

एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीचा विचार करून, दीर्घकालीन भाडेकरारापेक्षा अपफ्रंट प्रीमियमसह ९० वर्षांचा लीज मॉडेल महामंडळासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतो, अशी शिफारस सुबोधकुमार समितीने केली होती. त्यानंतर शासनाने भाडेपट्ट्याचा कालावधी वाढवून (४९+४९) ९८ वर्षांपर्यंत करण्यास मान्यता दिली आहे.

महामंडळाच्या राज्यभरातील सुमारे ८५० ठिकाणी ३५०० एकरांपेक्षा अधिक जमीन उपलब्ध आहे. यातील मोठ्या प्रमाणातील जमीनी मोक्याच्या ठिकाणी आहे. या जमिनींचा व्यापारी, निवासी, औद्योगिक तसेच अन्य व्यावसायिक कारणांसाठी नियोजनबद्ध विकास केल्यास महामंडळाला आगावू प्रीमियम सह मोठ्या प्रमाणावर नियमित उत्पन्न मिळू शकते. तसेच व्यवसायिक संकुलात देखील महामंडळाला हिस्सा मिळणार असल्याने त्यातून नियमित वार्षिक उत्पन्न देखील महामंडळाला प्राप्त होणार आहे.

याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “एसटी महामंडळाच्या मालकीच्या जमिनी हा महामंडळाचा मौल्यवान ठेवा आहे. या जमिनींचा विनियोग केवळ तात्पुरत्या उत्पन्नासाठी नव्हे, तर एसटीच्या दीर्घकालीन आर्थिक सक्षमीकरणासाठी करण्यात येणार आहे. पारदर्शक निविदा प्रक्रिया, योग्य व्यावसायिक नियोजन आणि PPP तत्त्वाच्या माध्यमातून या मालमत्तेतून महामंडळाला अधिकाधिक उत्पन्न मिळवून देणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे.”

“एसटीच्या प्रवासी सेवेला अधिक सक्षम करण्यासाठी आर्थिक स्वावलंबन आवश्यक आहे. त्यामुळे महामंडळाच्या अतिरिक्त जमिनींचा योग्य पद्धतीने विकास करून त्यातून मिळणारे उत्पन्न एसटीच्या सेवा-सुविधांच्या बळकटीकरणासाठी उपयोगात आणले जाईल,” असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.

केंद्राकडून राज्यातील दुष्काळाचा आढावा; परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पथक महाराष्ट्रात

Web Title: Maharashtra government approves msrtc surplus land commercial development 49 plus 49 years lease ppp model sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • msrtc
  • pratap sarnaik
  • st bus
  • st mahamandal

संबंधित बातम्या

Mira Bhayandar News: मिरा-भाईंदरमध्ये वादग्रस्त बांधकाम परवानग्यांना दणका; दोन परवानग्या रद्द!
1

Mira Bhayandar News: मिरा-भाईंदरमध्ये वादग्रस्त बांधकाम परवानग्यांना दणका; दोन परवानग्या रद्द!

Air Ambulance: एअर ॲम्ब्युलन्स सेवेला मिळणार नवी दिशा; दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश, प्रताप सरनाईक यांची माहिती
2

Air Ambulance: एअर ॲम्ब्युलन्स सेवेला मिळणार नवी दिशा; दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश, प्रताप सरनाईक यांची माहिती

भाजप- शिवसेनेत जुंपली! पाणीपुरवठा, मेट्रो प्रकल्पाचे श्रेय भाजपला, एकनाथ शिंदेंचे Mira Bhayandarसाठी योगदान काय?
3

भाजप- शिवसेनेत जुंपली! पाणीपुरवठा, मेट्रो प्रकल्पाचे श्रेय भाजपला, एकनाथ शिंदेंचे Mira Bhayandarसाठी योगदान काय?

Political News : ‘१५० कोटींचा भाव’ कसा सुरू होतो? संजय राऊतांच्या दाव्यावर प्रताप सरनाईकांचा घणाघात
4

Political News : ‘१५० कोटींचा भाव’ कसा सुरू होतो? संजय राऊतांच्या दाव्यावर प्रताप सरनाईकांचा घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.