'एसटी' बसची चाके थांबणार! प्रलंबित मागण्यांसाठी १३ ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन (फोटो सौजन्य-X)
ST Employees Protest News in Marathi : एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता फरक, वेतनवाढ फरक रक्कम, दिवाळी भेट रक्कम, सण उचल आदी मागण्यांचे फलक व पेटती मशाल हातात घेऊन राज्यातील ५०० पेक्षा जास्त एसटीतील कामगार प्रतिनिधींनी १२ ऑक्टोबर पासून होणाऱ्या आंदोलनाच्या टीझरचे सादरीकरण केले असून एसटी प्रशासनाला गंभीर इशारा दिला आहे. मुदती पूर्वी प्रश्न सुटले नाहीत तर आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिला आहे.
आज (6 ऑक्टोबर) दादरच्या टिळक भवन येथील सभागृहात एसटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यासाठी १२ ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजल्यापासून होणाऱ्या बेमुदत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या टीझर सादरीकरण सभेत बोलत होते. सभेला राज्य भारतातून मोठ्या संख्येने प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच एसटी कामगारांच्या चळवळीच्या इतिहासात पहिल्यांदाच मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. १२ ऑक्टोबरच्या रात्री बारा वाजल्यापासून होणार असून या आंदोलनाचे रूपांतर पुढे बेमुदत ठिय्या आंदोलनात होणार असल्याने त्याचा प्रवाशी वाहतुकीवर परिणाम होऊ व प्रवाशांची गैरसोय होऊ नये ही आमची इच्छा असून प्रशासनाने सुद्धा याकडे गंभीरतेने लक्ष दिले पाहिजे, असेही बरगे यांनी यावेळी सांगितले.
प्रलंबित मागण्याकडे लक्ष वेधताना ते म्हणाले की, २०१६ पासूनचा एसटी कामगारांचा ११०० कोटी रुपयांचा महागाई भत्त्याचा फरक मिळालेला नसून वेतनवाढ फरकाची २३१८ कोटी रुपयांची रक्कम देण्यात आलेली नाही.या शिवाय १७००० हजार रुपये इतकी रक्कम दिवाळी भेट म्हणून देण्यात आली पाहिजे. १२५०० सण उचल मिळाली पाहिजे अशा अनेक प्रकारच्या मागण्या आजही प्रलंबित असून वेगवेगळ्या प्रकारच्या एकूण थकीत रक्कमेचा आकडा चार हजार कोटी रुपयांवर गेला असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की,प्रत्येक कर्मचाऱ्यांला ही रक्कम विभागून द्यायची झाली तर हा आकडा सरासरी तीन लाख ७७ हजार रुपये इतका होणार असून ही संपूर्ण रक्कम हडप करण्याचा डाव प्रशासनाने रचला असून ही रक्कम कधी मिळेल हे प्रशासनाने जाहीर करावे नाहीतर त्याचे गंभीर परिणाम होतील व आंदोलनाची व्याप्ती वाढेल व आंदोलन तीव्र होईल असेही बरगे यांनी या वेळी बोलताना सांगितले.
१) एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता देण्यात येतो. सध्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना ५५% इतका महागाई भत्ता मिळत असून एसटी कर्मचाऱ्यांना मात्र ५३% इतका मिळत आहे. सदरचा महागाई भत्ता पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात यावा. तसेच एप्रिल २०१६ ते मार्च २०२० या कालावधीची सीटीसी सह १६८.३१ कोटी रुपये इतकी महागाई भत्त्याची रक्कम प्रलंबीत आहे. जानेवारी २०२० ते जून २०२४ या कालावधीतील महागाई भत्त्याची सीटीसी सह ५४.९४ कोटी इतकी रक्कम प्रलंबीत आहे. जुलै २०२० ते जून २०२४ या कालावधीतील २०६.६ कोटी रुपये इतकी महागाई भत्त्याच्या फरकाची रक्कम प्रलंबीत आहे. महागाई भत्त्याच्या फरकाची पूर्वीची एकून १०९०.१५ कोटी रुपये इतकी रक्कम थकीत असून ती कर्मचाऱ्यांना अद्यापही मिळालेली नाही. फरकासह थकीत महागाई भत्त्याची पूर्ण रक्कम कर्मचाऱ्यांना अदा करण्यात यावी.
२) २०१६ ते २०२० या कालावधीत जी वेतनवाढ जाहीर करण्यात आली आहे त्यात त्रूटी असून त्याचा घरभाडे भत्त्याचा दर ८,१६, २४ टक्क्यांऐवजी ७, १४, २१ टक्के व वार्षिक वेतनवाढीचा दर ३ टक्क्यांऐवजी २ टक्के असा कमी करण्यात आला आहे. माहे नोव्हेंबर २०२१ पासून सदरचा वाढीव दर कामगारांना लागू केलेला असून माहे सन एप्रिल २०१६ ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीची घरभाडे भत्त्याची वार्षिक वेतनवाढीची वाढीव दराची थकबाकी तसेच १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२४ या कालावधीची देय असलेली थकबाकी प्रलंबीत आहे.
३) राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५०% च्या वर गेल्यानंतर त्यांच्या घरभाडे भत्त्यात अनुक्रमे १०, २०, ३० टक्के या प्रमाणात वाढ झाली असून त्याची अंमलबजावणी एस.टी. महामंडळात देखील करण्यात यावी.
४)१ एप्रिल २०२० च्या मूळ वेतनात सरसकट ५५०० ऐवजी ६५०० इतकी वाढ करण्याचे निर्देश तत्कालीन मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांनी दिले होते. त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे.
५) महामंडळात चालक व वाहक पदातील साधारण ५००० पेक्षा जास्त कर्मचारी गेली अनेक वर्ष हंगामी वेतन श्रेणीवर काम करीत असून सन २०१६ मध्ये चालक तथा वाहक है पद निर्माण करण्यात आले असून सदर कर्मचाऱ्यांना चालकाच्या मंजूरीत टाकल्याने त्यापदात अतिरीक्त कर्मचारी झाले आहेत. महामंडळात वाहक या पदातील ३७३० पदे रिक्त असून चालक, वाहक तसेच चालक तथा वाहक या पदाची एकत्रीत मंजूरी गृहीत धरल्यास ३७३० चालक व वाहक नियमीत वेतन श्रेणीवर येतील तरी चालक, वाहक तसेच चालक तथा वाहक या पदांची मंजूरी एकत्रीत करून हंगामी वेतन श्रेणी वरील कर्मचाऱ्यांना समय वेतन श्रेणीवर घेण्यात येऊन त्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यात यावे.
६) सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची रजारोखीकरणासहीत सर्व थकीत देणी एकरक्कमी देण्यात यावीत तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना व सेवेतील कर्मचाऱ्यांना वर्षभराचा मोफत प्रवासाचा पास देण्यात यावा.
७) एसटी कर्मचाऱ्यांना राज्यशासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा वेतन कमी मिळत असून ते राज्यशासकीय कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने देण्यात यावे.
८) एस.टी कर्मचाऱ्यांना यंदाच्या दिवाळीसाठी दिवाळी भेट म्हणून रुपये १७ हजार इतकी रक्कम देण्यात यावी.
९) महामंडळात कर्मचाऱ्यांकडून चुक झाल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाते, पण अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात मात्र टाळाटाळ केली जात आहे. सुरक्षा व दक्षता खात्याने अधिकाऱ्यांचे अनेक अर्थिक घोटाळे उघडकीस आणले असून त्यांच्यावर बदलीसह प्रमादिय कारवाई करण्योचे सुचविले आहे तरीही अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली नसून सदरचा आढावा घेऊन संबंधीत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.
१०) एसटीच्या मोकळ्या जागा विकसीत करतांना त्यातून जास्तीत जास्त प्रिमीयम रक्कम मि प्रयत्न करावेत व सदरची रक्कम फिक्स डिपॉझीटमध्ये ठेऊन त्याच्या व्याजातून कर्मचाऱ्यांची प्रलंबीत देणी व महामंडळासमोरची प्रलंबीत देणी देता येईल अशा प्रकारची योजना आखण्यात यावी व तसे शक्य नसल्यास महामंडळाने स्वतः जागा विकसीत कराव्यात व त्यासाठी लागणाऱ्या कर्जाची हमी राज्य सरकारणे घ्यावी, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात यावी.
११) एस. टी कर्मचाऱ्यांना रुपये १२५००/- इतकी रक्कम सण उचल म्हणून देण्यात यावी.