
मुंबईतून सुरू होणार 2026 चा हरित क्रांतीचा प्रवास
Mumbai Climate Week 2026: भारताच्या पहिल्या जागतिक हवामान कृती आणि सोल्युशन प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या मुंबई क्लायमेट वीक (MCW) ने फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या प्रमुख कार्यक्रमापूर्वी आज क्लायमेट इनोव्हेशन चॅलेंजच्या शुभारंभाची घोषणा केली. भारत आणि ग्लोबल साउथमध्ये मोठ्या प्रमाणावर लागू करता येतील अशा नवीनतम हवामान उपायांना ओळख, चाचणी आणि व्यापक प्रसार देण्यासाठी डिझाइन केलेला हा बहुपदरी आणि अभिनव उपक्रम आहे.
Project Mumbai, महाराष्ट्र शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) यांच्या भागीदारीतून आयोजित MCW हे जगभरातील हवामान तज्ज्ञ, युवक, नवोन्मेषक, नागरी संस्था, विद्यार्थी, उद्योग आणि परोपकारी संस्थांना एकत्र आणणारे व्यासपीठ आहे. हा कार्यक्रम 17–19 फेब्रुवारी 2026 रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे होणार आहे. भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
NSE हा इनोव्हेशन चॅलेंज पार्टनर म्हणून या उपक्रमाचे नेतृत्व करणार आहे. हवामान बदल शमन, अनुकूलन आणि रेसिलियन्ससाठी आवश्यक नवोन्मेषाकडे प्रकाशझोत टाकण्याचे उद्दिष्ट आहे. स्टार्टअप्स, विद्यार्थी, संशोधक, NGO, CSO, नवोन्मेषक आणि क्लायमेट उद्योजक यांना यात सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. अंतिम सादरीकरण MCW 2026 मध्ये मंचावर करण्यात येईल. ग्लोबल साउथमधील अनेक देशांना आमंत्रित करण्यात आले असून, ही स्पर्धा भारतातील उपायांना जागतिक दृश्यात स्थान देणारी ठरेल.
महाराष्ट्र शासन, माझी वसुंधरा, BMC, Monitor Deloitte, HT Parekh Foundation, India Climate Collaborative (ICC), Shakti Foundation, WRI India, UNICEF, Rainmatter Foundation, Mahindra Group, Climate Group, NGMA आणि अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांनी MCW ला साथ दिली आहे, ज्यामुळे हा उपक्रम जागतिक आणि स्थानिक नेतृत्वाचा अद्वितीय संगम ठरतो.
MCW हे नागरिक-केंद्रित उपक्रम म्हणून रचले गेले आहेत. हवामान कृती (CLIMATE ACTION), संवाद, आणि विविध क्षेत्रांतील म्हणजेच चित्रपट, पाककला, कला, क्रीडा, आरोग्य यातील हवामानाशी संबंधित चर्चा आणि उपक्रमांना चालना देणार आहे. NSS स्वयंसेवकांच्या मदतीने महाविद्यालयेही मोठ्या प्रमाणावर या प्रक्रियेत सहभागी होतील.
हेही वाचा : Anil Ambani गोत्यात! ईडीची धडक कारवाई; 1,400 कोटींची मालमत्ता जप्त; सुप्रीम कोर्टाने…
शिशिर जोशी, संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रोजेक्ट मुंबई, याप्रसंगी म्हणाले: “मुंबई क्लायमेट वीक हे कल्पनांना प्रत्यक्ष कृतीत बदलण्यासाठी सक्षम प्लॅटफॉर्म निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे. NSE सोबतची भागीदारी आमच्या प्रयत्नांना नवी दिशा आणि वेग देत आहे. शहरे आणि समुदाय हवामान बदलाशी सक्षमपणे जुळवून घेऊ शकतील अशा उपायांना पुढे नेणे हे आमचे ध्येय आहे. नवोन्मेषक (Startups), गुंतवणूकदार (Investors), तज्ञ, स्थानिक संस्था आणि धोरणकर्त्यांना एकाच व्यासपीठावर आणून आम्ही मुंबईसह संपूर्ण प्रदेशासाठी हवामान कृतीचे नवे मार्ग खुलं करत आहोत.”
आशिषकुमार चौहान, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, NSE, म्हणाले: “फेब्रुवारी 2026 मध्ये होणारा मुंबई क्लायमेट वीक हा भारताच्या Net Zero 2070 च्या ध्येयप्राप्तीच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. या ध्येयासाठी 2070 पर्यंत 10 ट्रिलियन USD पेक्षा अधिक गुंतवणुकीची आवश्यकता आहे—स्वच्छ ऊर्जा, हरित वाहतूक आणि सक्षम पायाभूत सुविधा यामध्ये मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक होणे गरजेचे आहे.
NSEमध्ये या भांडवली गुंतवणूकीसाठी भांडवली बाजारात अनेक प्रकारची साधने उपलब्ध आहेत. हवामानविषयक वित्तीय साधनांद्वारे या परिवर्तनाला हातभार लावत आहे. त्यात Monthly Electricity Futures, GSS+ आणि Transition Bonds, Green Equity Pathway, CFD आणि आगामी कार्बन मार्केट उत्पादनांचा समावेश आहे., मुंबई क्लायमेट वीकसोबतची ही भागीदारी भारताला हरित नवोन्मेष (Green Startup) आणि शाश्वत विकासाच्या जागतिक नेतृत्वाकडे नेण्याची आमची बांधिलकी अधिक दृढ करते.”