मोठी बातमी! मराठा आंदोलनाआधी सरकार अॅक्शन मोडमध्ये; OBC समाजामध्ये 29 जातींचा समावेश होणार?
मुंबई: राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. यासाठी त्यांनी आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे. दरम्यान त्यासाठी 29 तारखेला जरांगे पाटील हे मुंबईत धडक देणार आहेत. मात्र त्या आधी राज्य सरकार ओबीसी समाजाबाबत महत्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
राज्याच्या ओबीसी जातींच्या महाराष्ट्राच्या यादीत आता नव्या जातींचा समावेश करण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या आहेत. यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारकडे शिफारशीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला आहे. राज्य सरकारने मान्यता दिल्यास हा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे जाणार आहे.
राज्यात ओबीसी जातींची यादी खूप मोठी आहे. यामध्ये अनेक जाती आहेत. उपजाती आहेत. आता राज्यातील अन्य जातींचा राज्याच्या ओबीसी जातींच्या यादीत समावेश करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारकडे केली आहे. राज्य सरकारने यावर प्रस्ताव मंजूर केल्यास तो प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. यामध्ये 29 जातींचा समावेश करण्यात यावा अशी शिफारस करण्यात आली आहे.
29 तारखेला जरांगे मुंबईत धडक देणार
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाले आहेत. ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी ते 29 मुंबईत धडक देणार आहेत. ऐन गणपतीच्या कालावधीत मनोज जरांगे पाटील हे मुंबईत धडक देणार आहेत. कोणीही आडवे आले तरी, आम्ही २९ ऑगस्टला मुंबईला जाणारच असा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास मुंबई सोडणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.
मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. २९ ऑगस्ट रोजी त्यांनी चलो मुंबईची हाक दिली आहे. मोठ्या ताकदीने मराठा समाज मुंबईत धडकणार आहे. त्यासाठी जरांगे पाटील यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मुंबईत आम्हाला आरक्षण दिले तर गुलाल लावून परतणार असेंजरांगे पाटील म्हणाले. आरक्षण दिले नाही तर मुंबई सोडणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
‘कोणीही आडवा आला, माझा जीव गेला तरी…’; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा
माझा जीव गेला तरी मी मुंबईत जाणारच. आझाद मैदानात बसून आरक्षणासाठी लढा देणार. यावेळी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. सत्ता असेल तर काहीही करता येते असे वाटत असेल तर मुख्यमंत्र्यानी या गैरसमजातून बाहेर यावे, असे जरांगे पाटील म्हणाले आहेत.