मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक (फोटो- सोशल मीडिया)
१. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील आक्रमक
२. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी
३. २९ ऑगस्टला मुंबईत धडक देणार
मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाले आहे. त्यांनी पुन्हा एकदा सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. ऐन गणपतीच्या कालावधीत मनोज जरांगे पाटील हे मुंबईत धडक देणार आहेत. कोणीही आडवे आले तरी, आम्ही २९ ऑगस्टला मुंबईला जाणारच असा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास मुंबई सोडणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.
मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. २९ ऑगस्ट रोजी त्यांनी चलो मुंबईची हाक दिली आहे. मोठ्या ताकदीने मराठा समाज मुंबईत धडकणार आहे. त्यासाठी जरांगे पाटील यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मुंबईत आम्हाला आरक्षण दिले तर गुलाल लावून परतणार असेंजरांगे पाटील म्हणाले. आरक्षण दिले नाही तर मुंबई सोडणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
माझा जीव गेला तरी मी मुंबईत जाणारच. आझाद मैदानात बसून आरक्षणासाठी लढा देणार. यावेळी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. सत्ता असेल तर काहीही करता येते असे वाटत असेल तर मुख्यमंत्र्यानी या गैरसमजातून बाहेर यावे, असे जरांगे पाटील म्हणाले आहेत.
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार
मराठा आरक्षणाची ही अंतिम लढाई आहे. २९ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्र मुंबईला धडकणार असून आरक्षणाचा निर्णय लागल्याशिवाय आता थांबणार नाही. एक घर, एक गाडी मुंबईला दाखल होणार असून आता मराठा समाज थांबणार नाही. आमची ताकद पूर्ण महाराष्ट्राने बघितली आहे. पुन्हा एकदा ताकद दाखवण्यासाठी मुंबईत या, असे आवाहन मराठा आंदाेलक मनोज जारंगे पाटील यांनी केले. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. २९ तारखेला मराठा समाज मुबईत जाणार असल्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे.
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार; शिरोळमधून सरकारला दिला इशारा
पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाने आम्ही सधन आहोत, असे न समजता आरक्षणासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. ५८ लाख मराठा समाज कुणबी सापडला आहे. अजून तीन कोटी मराठा समाजाला कुणबी दाखले मिळतील. याचा फायदा नक्कीच समाजाला होणार आहे. शिरोळकरांच्या दाखल्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. २९ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज मुंबईत दाखल होणार आहे. आंदोलन यशस्वी होईपर्यंत माघार नाही. या आंदोलनामुळे समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक प्रगतीला आता कोणीही अडवू शकणार नाही, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले.