मुंबई : देशातील राज्य सरकारे (State Governments) आणि महापालिका परिवहन बसेसना (Municipal Transport Buses) डिझेल दरवाढीतून सूट (Exemption From Diesel Price Hike) देण्यात यावी अशी विनंती करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पाठवले आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये होत असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ लक्षात घेता केंद्र सरकारने घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात प्रति लिटर २५ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र या निर्णयाचा सरकारी आणि महानगरपालिका परिवहन सेवांवर आर्थिकदृष्ट्या विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे असे महेश तपासे यांनी निवेदनात म्हटले आहे.