फोटो सौैजन्य: iStock
भारतीय बाजारात विविध सेगमेंटमध्ये कार उपलब्ध आहेत. मात्र, जेव्हा लक्झरी सेगमेंटमधील कार्सची चर्चा होते तेव्हा फक्त एकाच कंपनीचे नाव जास्तकरून आपल्याला आठवते. ते नाव म्हणजे Mercedes Benz. अनेक सेलिब्रेटी, उद्योगपती आणि उच्चवर्गीय लोकांच्या ताफ्यात आपल्याला मर्सिडीज बेंझच्या कार पाहायला मिळतात. भारतीय मार्केटमध्ये कंपनीच्या कारची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते, मात्र आता कंपनीने आपल्या काही मॉडेल्सच्या किमतीत वाढ केली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
भारतीय मार्केटमध्ये मर्सिडीज बेंझ अनेक वर्षांपासून लक्झरी कार विकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता कंपनीने त्यांच्या कारच्या किमती वाढवल्या आहेत. कंपनीने कोणत्या कारच्या किमती किती वाढवल्या आहेत? ते कधीपासून लागू झाले आहे? या प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेऊयात.
फक्त 5 मिनिटात चार्जिंगवर 400 KM ची रेंज ! Mercedes कडून सर्वात पॉवरफुल इलेक्ट्रिक कार सादर
मर्सिडीज बेंझने भारतीय मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या काही कार्सच्या किमतीत वाढ केली आहे. ही वाढ कंपनीने तात्काळ लागू केली आहे. त्यानंतर, आता या कार्स खरेदी करण्यासाठी जास्त किंमत मोजावी लागणार आहे.
मर्सिडीज बेंझने संपूर्ण पोर्टफोलिओची किंमत वाढवली नाही. त्याऐवजी, काही मॉडेल्सच्या किमती वाढल्या आहेत. माहितीनुसार, ई-क्लास, जीएलए, जीएलसी, सीएलई कॅब्रिओलेट मॉडेल्सच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत.
माहितीनुसार, कंपनीने त्यांच्या कारच्या किमतीत 3.70 लाख रुपयांपर्यंत वाढ केली आहे. कॅब्रिओलेटमध्ये ही वाढ करण्यात आली आहे. जीएलई मॉडेलच्या किमतीत 1.50 लाख रुपयांची वाढ झाली आहे. ई-क्लाससाठी दोन लाख रुपये अधिक द्यावे लागतील. त्यानंतर जीएलएची किंमत 70 हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे.
1 लाखापेक्षा कमी Down Payment केल्यास Tata Punch होईल का तुमची? असा असेल संपूर्ण हिशोब
माहितीनुसार, मर्सिडीज बेंझने आपल्या मॉडेल्सच्या किमती वाढवण्याचे कारण म्हणजे युरोच्या किमतीत रुपयाच्या तुलनेत सतत चढ-उतार होत आहे. ज्यामुळे कंपनीचा खर्च वाढत आहे. विशेष म्हणजे याआधीही कंपनीने जानेवारीमध्ये किमती वाढवल्या आहेत.
माध्यमांच्या वृत्तानुसार, जूनच्या अखेरीस मर्सिडीज बेंझने ही वाढ केली आहे. परंतु सप्टेंबर 2025 पर्यंत कंपनी पुन्हा एकदा त्यांच्या कारच्या किमती वाढवू शकते अशी शक्यता आहे. जर असे झाले तर कंपनी वर्षभरात तिसऱ्यांदा किमती वाढवेल.