मुंबई : आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकींच्या (BMC Electioin) पाशर्वभूमीवर आज मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) मेळावा पार पडला. मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा मुंबईतील मुंबईतील नेस्को मैदानावर पार पडला. या मेळावाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. जवळपास पाऊणतास राज ठाकरेंनी आपल्या भाषणात विविध मुद्द्यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी विरोधकांचा समाचार घेताना त्यांनी राज्यपाल, महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे, महापुरुषांची बदनामा करणाऱ्यांवर तसेच उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका होतील तेव्हा होतील, पण कामाला लागा, विजय आपलाच आहे, मी तुम्हाला मुंबई महानगर पालिका हातात देतो, असा विश्वास व कानमंत्र राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना यावेळी दिला.
[read_also content=”…म्हणून सुषमा अंधारेंना पक्ष्यात घेतले आहे, राणेंचा अंधारेंवर पलटवार https://www.navarashtra.com/maharashtra/central-minister-narayan-rane-attacked-to-sushma-andhare-348946.html”]
महापुरुषांची बदनामी करणं थांबवा
दरम्यान, राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण तापले होते. यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. आपल्या भाषणात राज ठाकरेंनी राहुल गांधींचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी थोर पुरुषांची बदनामी करणं थांबावा आता. मला सर्व पक्षांना म्हणजे काँग्रेससह भाजपाने देखील महापुरुषांवर बोलणं थांबवले पाहिजे, असं आवाहन राज ठाकरेंनी सर्वांना केलं. जवाहरलाल नेहरुंची बदनामी थांबवली पाहिजे, फोटो व्हायरल करुन नेहरुंची बदनामी केली जात आहे. दोन्हीकडून देखील बस्स झाले आता. असं राज ठाकरेंनी म्हटलं.
याव्यतिरिक्त राज्यात व देशात अनेक प्रश्न आहेत, रोजगार, शेती, सुरक्षितता असं विषय असताना, आम्ही ऐकमेकांची बदनामी करतोय. हे थांबले पाहिजे असं राज ठाकरे म्हणाले. यावेळी राज ठाकरेंनी पु. ल. देशपांडे यांच्या अंतूबर्वा या पुस्तकातील पात्राचा दाखला दिला. अंतूबर्वासारखे झाले आहे. आजही चारही बाजूंनी चिखलफेक होत आहे, नवोदित पिढिसमोर कोणता आदर्श आपण ठेवणार हा खरा प्रश्न आहे? असं राज ठाकरेंनी म्हणत महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांवर जोरदार प्रहार केला.