Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षण विभागाचा अजब कारभार; फाईलवर सही करायला अधिकाऱ्यांना मिळेना वेळ?

मुख्याध्यापक पदोन्नती, केंद्रप्रमुख पदोन्नती, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन हे विषय गेली अनेक वर्षे प्रलंबित आहेत, परंतु शिक्षण विभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. एका वस्तीशाळेवर काम करणाऱ्या शिक्षिकेला डीएडची वेतनश्रेणी देण्याची फाईल सहा वर्षांपासून जिल्हा परिषदेमध्ये पडून आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 15, 2023 | 09:21 AM
शिक्षण विभागाचा अजब कारभार; फाईलवर सही करायला अधिकाऱ्यांना मिळेना वेळ?
Follow Us
Close
Follow Us:

यवत : मुख्याध्यापक पदोन्नती, केंद्रप्रमुख पदोन्नती, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन हे विषय गेली अनेक वर्षे प्रलंबित आहेत, परंतु शिक्षण विभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. एका वस्तीशाळेवर काम करणाऱ्या शिक्षिकेला डीएडची वेतनश्रेणी देण्याची फाईल सहा वर्षांपासून जिल्हा परिषदेमध्ये पडून आहे. वजन ठेवल्याशिवाय फाईल पुढे जातच नाही; अशी चर्चा शिक्षकांमध्ये ऐकायला मिळत आहे. त्यामुळे शासनाने गुप्तचर विभागाच्या यंत्रणेमार्फत शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे उत्पन्न व मत्तादायित्व यामध्ये नोंदवलेले उत्पन्न यांचा पडताळा घेऊन सखोल चौकशी करण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेत हेलपाटे मारून शिक्षिका मात्र त्रस्त आहे.

जिल्हा परिषदेत सावळा गोंधळ सुरू

पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या अजब कारभाराची मालिका सुरूच असून, पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एका शाळेतील शिक्षिका सहा वर्षांपूर्वी डीएड उत्तीर्ण झालेल्या आहेत. डीएड उत्तीर्ण होऊन सहा वर्षे झाली; तरी नियमित शिक्षकाचे वेतनाचे लाभ त्यांना अद्याप मिळालेले नाहीत. शिक्षण विभागात त्या वारंवार हेलपाटे मारत आहेत, परंतु तेथील अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना फाईलचा निपटारा करायला सहा वर्ष झाली, तरी वेळच मिळाला नाही. हे कमी का काय म्हणून एकाच वेळेस शिक्षण विभागातील १८ कर्मचाऱ्यांचे टेबल बदलण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेत सावळा गोंधळ सुरू आहे. या कर्मचाऱ्यांना नवीन टेबलची माहिती होण्यास व जिल्हा परिषदेचा कारभार सुरळीत होण्यास कमीत कमी सहा महिन्याचा कालावधी लागणार आहे. कोणतेही काम तातडीने मार्गी लावले जात नाही. जाणीवपूर्वक फाईली एकाच टेबलवर अडवून ठेवल्या जात आहेत.

शिक्षकाचे आर्थिक लाभ मिळणे आवश्यक

याबाबत गौतम कांबळे म्हणाले की, दौंड तालुक्यातील एक शिक्षिका दिनांक १ मार्च २०१४ पासून वस्तीशाळा शिक्षिका म्हणून काम करत आहेत. त्यांनी १ सप्टेंबर २०१७ रोजी डीएड उत्तीर्ण केलेले आहे. वस्ती शाळा शिक्षिका म्हणून काम करत असलेल्या शिक्षकेला डीएड झाल्यामुळे नियमित शिक्षकाचे आर्थिक लाभ मिळणे आवश्यक आहे. तसा प्रस्तावितही त्यांनी जिल्हा परिषदेला सादर केला आहे. परंतु तेथील अजब कारभारामुळे सहा वर्षापासून त्यांची फाईल अधिकाऱ्यांच्या सहीसाठी पडून आहे व डीएड झालेल्या शिक्षिकेला अद्याप वस्ती शाळेवर काम करत असल्याचा पगार मिळत आहे.

कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी

फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात महिला शिक्षिकेचा पुणे जिल्हा परिषद कशा पद्धतीने सन्मान करत आहे, याचे हे एक बोलके उदाहरण आहे. वरिष्ठांनी याची दखल घेऊन जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाने पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांच्याकडे केली आहे. आता वरिष्ठ कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Strange administration of education department officers do not get time to sign the file nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2023 | 09:21 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • maharashtra
  • NAVARASHTRA
  • Pune
  • Yavat

संबंधित बातम्या

Holi 2026: ‘जावयाची गाढवावरून धिंड’ , होळीच्या दिवशी महाराष्ट्रातील या जिल्ह्यात जावयाला मानपान देण्याची अनोखी पद्धत
1

Holi 2026: ‘जावयाची गाढवावरून धिंड’ , होळीच्या दिवशी महाराष्ट्रातील या जिल्ह्यात जावयाला मानपान देण्याची अनोखी पद्धत

ग्रामीण भागात कुक्कुटपालनाची ‘भरारी’; नोकरीपेक्षा व्यवसायाकडे युवकांचा ओढा!
2

ग्रामीण भागात कुक्कुटपालनाची ‘भरारी’; नोकरीपेक्षा व्यवसायाकडे युवकांचा ओढा!

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विषय समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड; कुणाकुणाला मिळाली संधी?
3

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विषय समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड; कुणाकुणाला मिळाली संधी?

माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांचं निधन; 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4

माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांचं निधन; 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.