Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभ्यास झाला नाही म्हणून थेट प्रश्नपत्रिकाच चोरल्या; सांगोल्यात दहावीच्या पेपर चोरीचा छडा

चोरी करण्यापूर्वी त्याने केंद्रावरील स्ट्रॉग रूमची पद्धतशीर पाहणी केली होती आणि त्यानंतर पहाटे दोनच्या सुमारास इलेट्रिक बाईकवर इलेक्ट्रिक कटर घेऊन तो शाळेत पोहोचला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 20, 2026 | 12:18 PM
अभ्यास झाला नाही म्हणून थेट प्रश्नपत्रिकाच चोरल्या; सांगोल्यात दहावीच्या पेपर चोरीचा छडा

अभ्यास झाला नाही म्हणून थेट प्रश्नपत्रिकाच चोरल्या; सांगोल्यात दहावीच्या पेपर चोरीचा छडा

Follow Us
Follow Us:

सांगोला : सांगोला येथील सांगोला विद्यामंदिर शाळेतून दोन दिवसांपूर्वी चोरीला गेलेल्या दहावीच्या भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिका शोधण्यात पोलिसांना अखेर यश आले. याप्रकरणी त्याच केंद्रावर परीक्षा देणाऱ्या एका विधी संघर्षित अल्पवयीन विद्यार्थ्यांचा सहभाग उघड झाला आहे. विशेष म्हणजे, हे कृत्य करणारा विद्यार्थी स्वतः दहावीत शिकत असून, भूगोलाचा पेपर दिल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या शोधमोहिमेचा असा नाट्यमयरित्या शेवट झाला आहे.

भूगोलाचा पुरेसा अभ्यास झाला नसल्यामुळे या विधी संघर्षग्रस्त अल्पवयीन विद्यार्थ्याने प्रश्नपत्रिका चोरी केल्याची कबुली पोलिसांच्या चौकशीत दिली आहे. सांगोला पोलिसांनी या विधी संघर्षग्रस्त अल्पवयीन विद्यार्थ्याकडून चोरीला गेलेल्या ५० प्रश्नपत्रिका, ३ कोऱ्या उत्तरपत्रिका, इलेक्ट्रिक कटर आणि गुन्ह्यात वापरलेली इलेट्रिक बाईक हस्तगत केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आजचा पेपर होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, शिक्षण मंडळाने रात्री उशिरा नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच परीक्षा घेण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यानुसार, राज्यातील सर्व केंद्रांवर दहावीचा शेवटचा भूगोलाचा पेपर सुरळीतपणे पार पडला.

हेदेखील वाचा : राज्यात अनुदानित महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्राध्यापक भरती होणार; राज्य सरकारची महत्त्वाची माहिती

दरम्यान, पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत असे समोर आले आहे की, प्रश्नपत्रिका चोरणाऱ्या या विद्यार्थ्याने त्याचा इतर कोणाशीही शेअर करून गैरवापर केला नव्हता, ही प्रशासनासाठी मोठी दिलासादायक बाब ठरली.

कशी केली चोरी; सांगितला सारा घटनाक्रम

आपल्या पालकांसमोर दिलेल्या जबाबात त्याने सांगितले की, चोरी करण्यापूर्वी त्याने केंद्रावरील स्ट्रॉग रूमची पद्धतशीर पाहणी केली होती आणि त्यानंतर पहाटे दोनच्या सुमारास इलेट्रिक बाईकवर इलेक्ट्रिक कटर घेऊन तो शाळेत पोहोचला. कटरच्या साहाय्याने कुलूप तोडून त्याने भूगोलाच्या प्रश्नपत्रिकांचे दोन गढे आणि तीन कोऱ्या उत्तरपत्रिका लंपास केल्या. घरी पोहोचल्यावर त्याने त्यातील एक गठ्ठा फोडून प्रश्नपत्रिकाही पाहिली होती, अशी धक्कादायक माहिती या तपासातून समोर आली आहे.

Web Title: Students had not studied then stole the question paper

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 12:18 PM

Topics:  

  • Sangola News
  • Solapur News

संबंधित बातम्या

सोलापूर IT पार्कच्या जागेचा फेरअभ्यास; उद्योजकांच्या मागणीला उदय सामंतांचा सकारात्मक प्रतिसाद
1

सोलापूर IT पार्कच्या जागेचा फेरअभ्यास; उद्योजकांच्या मागणीला उदय सामंतांचा सकारात्मक प्रतिसाद

Dhairyashil Mohite यांची कथित Audio Clip Viral; धमकीच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ
2

Dhairyashil Mohite यांची कथित Audio Clip Viral; धमकीच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

दुध भेसळीच्या हॉटस्पॉटवर मुंढेंचा दुसरा सर्जिकल स्ट्राईक; १.३४ कोटींची संशयित पावडर जप्त, मंचरनंतर थेट अकलूजवर धाड
3

दुध भेसळीच्या हॉटस्पॉटवर मुंढेंचा दुसरा सर्जिकल स्ट्राईक; १.३४ कोटींची संशयित पावडर जप्त, मंचरनंतर थेट अकलूजवर धाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.