Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News : शाळेचा पहिला दिवस, चिमुकल्यांनी सूर्यफूलाचे मुखवटे परिधान करून केला प्रवेश

शाळेचा पहिला दिवस आहे. पुण्यातील कर्वेनगर प्रभागात विकसित केलेली भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल ई-लर्निंग स्कुल या ठिकाणीही पुन्हा एकदा मुलांच्या किलबिलाटाने परिसर दुमदुमून गेला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 16, 2025 | 03:20 PM
शाळेचा पहिला दिवस, चिमुकल्यांनी सूर्यफूलाचे मुखवटे परिधान करून केला प्रवेश

शाळेचा पहिला दिवस, चिमुकल्यांनी सूर्यफूलाचे मुखवटे परिधान करून केला प्रवेश

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : उन्हाळी सुट्टीनंतर आता पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात विदर्भ वगळता इतर सर्व विभागांत आजपासून तर विदर्भात सोमवार 23 जूनपासून होत आहे. शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी ‘शाळा प्रवेशोत्सवा’च्या माध्यमातून मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येत आहे. अशातचं आता पुण्यातील कर्वेनगर प्रभागात विकसित केलेली भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल ई-लर्निंग स्कुल या ठिकाणीही पुन्हा एकदा मुलांच्या किलबिलाटाने परिसर दुमदुमून गेला आहे.

ज्युनिअर केजी ते इयत्ता चौथी या वर्गांतील मुलांचे शाळेच्या पहिल्या दिवशी स्वागत करताना सर्व चिमुकल्यांनी सूर्यफूलाचे मुखवटे परिधान करून अनोख्या पद्धतीने शैक्षणिक वर्षांत प्रवेश केला. विद्यार्थी वर्गातील जागृती आणि सृजनशीलता वाढवण्यासाठी राबवण्यात आलेला हा उपक्रम मुलांच्या तसेच पालकांच्या विशेष पसंतीस उतरल्याचे दिसून आले.

याप्रसंगी मुलांचे स्वागत व मुलांना पाठ्यपुस्तके-शैक्षणिक साहित्याचे किट वाटप करण्यासाठी पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांनी उपस्थिती दर्शवली. त्यांनी विद्यार्थी वर्गाला तसेच शिक्षकांना मार्गदर्शन केले आणि शाळेचा आजवरचा प्रवास तसेच वैविध्यपूर्ण उपक्रमांचे भरभरून कौतुक केले. याप्रसंगी त्यांच्यासमवेत वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे प्रमुख सहाय्यक महापालिका आयुक्त दीपक राऊत उपस्थित होते.

तसेच माजी नगरसेविका लक्ष्मीताई दुधाने आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कोथरूड विधानसभा अध्यक्ष स्वप्नील दुधाने यांनीही उपस्थिती दर्शवली. पुणे शिक्षण मंडळाचे सहाय्यक उपप्रशासकीय अधिकारी धनंजय परदेशी, वारजे कर्वेनगर परिसराच्या पर्यवेक्षिका अरुणा राईंज, सामाजिक कार्यकर्ते  दत्तात्रय चौधरी, मुख्याध्यापिका लीना देशमुख, राजश्री भोसले, प्रीती थोरात तसेच सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्ग आदी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा : शाळेची पहिली घंटा वाजली; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

Web Title: Students welcomed in a unique way at a school in pune on the first day of school

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2025 | 03:14 PM

Topics:  

  • pune news
  • School
  • Student

संबंधित बातम्या

पुणेकरांना दिलासा! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘या’ बहुचर्चित उड्डाणपुलाचे लोकार्पण, वाहतूक कोंडीतून…
1

पुणेकरांना दिलासा! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘या’ बहुचर्चित उड्डाणपुलाचे लोकार्पण, वाहतूक कोंडीतून…

श्रद्धा अन् उत्साहाला भरते! पोलीस अन् पालिका अधिकाऱ्यांच्या घरी वाजत-गाजत गणरायाचे स्वागत
2

श्रद्धा अन् उत्साहाला भरते! पोलीस अन् पालिका अधिकाऱ्यांच्या घरी वाजत-गाजत गणरायाचे स्वागत

Photo : मुग्यांसारखी लोकांची गर्दी…! दगडूशेठ बाप्पाच्या चरणी भक्तांची रीघ,पहा खास फोटो
3

Photo : मुग्यांसारखी लोकांची गर्दी…! दगडूशेठ बाप्पाच्या चरणी भक्तांची रीघ,पहा खास फोटो

Ganeshotsav 2025 : संपूर्ण अखंड लाकडामध्ये घडवलेली श्रींची मूर्ती; पुण्यातील वैशिष्टपूर्ण धर्मवीर संभाजी तरुण मंडळ
4

Ganeshotsav 2025 : संपूर्ण अखंड लाकडामध्ये घडवलेली श्रींची मूर्ती; पुण्यातील वैशिष्टपूर्ण धर्मवीर संभाजी तरुण मंडळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.