Sub-Conservator of Forests orders to conduct a panchnama on illegal tree felling in Jawali satara news
मेढा : जावळी तालुक्यातील आसनी येथे भोगवटादार वर्ग दोन जमिनीमध्ये नियमबाह्यपणे गवडी बीडचे वनपाल यांच्या वरदहस्ताने वृक्षतोड करण्यात आली आहे .प्रत्यक्षात परवानगी एका गट नंबरची घेऊन वृक्षतोड दुसऱ्याच गट नंबर मध्ये येथे झालेली पाहायला मिळत आहे. उपवनसंरक्षक यांनी तालुक्यातील वृक्षतोडीचे प्रत्यक्षस्थळी जाऊन पंचनामा करावा व रिपोर्ट कळवावा असे आदेश दिले आहेत. मात्र जावळी वन विभागाकडून पंचनामा करण्यास विलंब केला जात आहे.
जावळी तालुका विभाग हा मनमानी कारभार करत असल्याच्या अनेक तक्रारी उपवनसंरक्षक यांच्याकडे करण्यात आले आहेत. तालुक्यातील आसनी येथे भोगवटादार जमीन दोन प्रकारामध्ये बेसुमार वृक्षतोड करण्यात आली आहे. या वृक्षतोडीचा पंचनामा व्हावा अशी मागणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाकडून करण्यात आली होती. या मागणीला दहा दिवस होऊन देखील अद्याप उपवनसंरक्षक यांनी चौकशीच्या आदेश देऊनहीं जावळी वन विभाग आसनी येथील वृक्षतोडीचा पंचनामा करीत नसल्याचे दिसून येत आहे.
राजकीय बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
तोडलेली झाडे वाहतूक करून घेऊन जाण्याच्या तयारीत व्यापारी असून व्यापाऱ्याकडून आसनी येथे तोडण्यात आलेल्या वृक्षांची लाकूड वाहतूक करून नेण्याच्या हालचाली जोरदार सुरू आहेत. रात्रीच्या वेळी ही वाहतूक करण्याची योजना व्यापाऱ्याने आखली असून वन विभागाने तात्काळ या ठिकाणचा पंचनामा करावा.
उपवनसंरक्षक यांचे चौकशीचे आदेश
आसनी येथील भोगवटदार वर्ग दोन जमिनीमध्ये झालेल्या वृक्षतोडीचा प्रत्यक्ष स्थळी जाऊन पंचनामा करावा व रिपोर्ट सादर करावा असे आदेश उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज यांनी वनपरिक्षेत्रअधिकारी जावली यांना दिले आहेत. त्यामुळे जावळी वनपरिक्षेत्रअधिकारी यांनी तात्काळ या ठिकाणी झालेल्या वृक्षतोडीचे बुंदे तपासून पंचनामा करावा ९० सेंटीमीटर पेक्षा जास्त व्यासाचे झाडे या ठिकाणी तोडण्यात आलेले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पाचगणी शहरात भिकारी आणि गर्दूल्याचां हैदोस
पाचगणी शहरात भिकारी आणि गर्दूल्यानी हैदोस माजवला असून नगरपालिकेच्या समोरच असणाऱ्या मैदानात काही भिकारी व गर्दुल्यांनी उघड्यावर आपले संसार थाटले आहेत. याकडे मात्र पालिका प्रशासन मूग गिळून गप्प आहे. आज येथील इमारतीचा दरवाजा या लोकांनी जाळून टाकला आहे. या लोकांवर तातडीने कारवाई करावी आणि त्यांना शहराबाहेर काढावे अशी मागणी होत आहे. नगरपालिकेच्या मराठी शाळेला लागूनच असणाऱ्या मोकळ्या जागेत गेली दोन वर्षापासून एक भिकारी जोडपे उघड्यावर आपला संसार थाटून राहत आहे. त्यांनी आता आणखी लोक त्याठिकाणी आणून स्थिरावली आहेत. रात्रीच्या वेळी दारू पिऊन या लोकांचा दंगा वाढला आहे. उघड्यावर चूल पेटवून त्यांचा उदरनिर्वाह चालला असला तरी यावठिकाणी त्यांनी केलेल्या घाणीमुळे या परिसराला दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. नगरपालिकेजवळ हा प्रकार असून पालिका या लोकांना का पाठीशी घालत आहे हा सवाल उपस्थित होत आहे.