अहमदनगर : राज्यात एकिकडे विरोधक सत्ताधारी ऐकमेकांवर चिखलफेक करत असताना, आता भाजपा पक्षातच कुरघोडी या आरोप प्रत्यारोपाचे राजकारण होताना दिसत आहे. कारण अहमदनगरमध्ये (Ahmednagar) माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यात आरोप प्रत्यारोप तसेच संघर्ष सुरु आहे. जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सुजय विखे पाटील यांचे पीए आणि कार्यकर्त्यांनी भाजप आमदार राम शिंदे यांच्या पॅनलच्या विरोधात उमेदवार उभे केल्याने राम शिंदे यांनी विखेंवर जोरदार टीका केली होती.याला आता खासदार सुजय विखे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
खासदार सुजय विखे पाटील काय म्हणाले?
भाजप आमदार राम शिंदे यांनी जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत खासदार सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांनी भाजप विरोधात काम केले. यावरून टीका केली होती. याला उत्तर देताना खासदार विखे म्हणाले की, ही गोष्ट पक्ष पातळीवर प्रदेशाध्यक्ष आणि आमचे नेते फडणवीस साहेबांसमोर मीटिंग घेऊन त्यांच्यामध्ये जो गैरसमज निर्माण झालेला आहे हा कशामुळे निर्माण झाला याची शहानिशा करावी लागेल. विखे पाटील परिवाराने पवार परिवाराबरोबर संघर्ष केलेला आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. मात्र, ही पहिली वेळ आहे की काल मीडियाच्या माध्यमातून विखेंनी पवारांना पाठिंबा दिला, अशी बातमी मला पाहायला मिळाली. या बातमीवर महाराष्ट्रातला कोणीही व्यक्ती विश्वास ठेवणार नाही, असे स्पष्टीकरण दिलं आहे.