
aramati Politics, Sunetra Pawar Oath Taking, Ajit Pawar Plane crash News
Maharashtra Politics: “पाटील असावा पण पटेल…”; सुनेत्रा पवार DCM होताच राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चांही सुरू होत्या. महत्त्वाची बाब म्हणजे, खुद्द अजित पवार हेच या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी आग्रही होते. त्यादृष्टीने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्यासोबत विलीनीकरणाच्य चर्चाही सुरू होत्या, अशीही माहिती समोर आली होती. पण अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूमुळे सर्वच चर्चांना खोडा पडला. यासगळ्यात सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी करण्यात इतकी घाई का केली जात आहे, असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला.
पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणून अजित पवार यांची भूमिका आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा पक्ष पुन्हा एकत्र येण्याची तयारी करत होता. पण अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या हालचाली थांबवण्यात आल्या. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांकडून पुन्हा पक्षाचे नेतृत्त्व सांभाळण्यासाठी हालचाली सुरू केल्या. सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षनेतेपदाची सुत्रे सोपवण्यात आली. पक्षात फूट पडू नये, पक्षात गटतट पडू नये, यासाठी हे सर्व करण्यात आले. पक्षाचे नेतृत्तव संपू नये, यासाठी सुनेत्रा पवार यांच्या कुटुंबियांकडून सर्वात आधी शपथविधी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Jayant Patil : “मला दोन्ही पक्ष एकत्र करायचे…”, अजितदादा पवारांबाबत जयंत पाटील स्पष्टच बोलले
अजित पवारांच्या निधनानंतर पवार कुटुंबाने पक्षाचे नेतृत्व पुन्हा स्थापित करण्याच्या हालचाली सुरू केल्या असून, संघटनेत फूट पडू नये यासाठी तातडीने गटनेत्याची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षाला संघटित ठेवून विलीनीकरणाच्या चर्चा पुढे नेण्याची जबाबदारी आपल्यावरच असेल याची जाणीव असल्यानेच, सुनेत्रा पवार आणि त्यांच्या समर्थकांनी शपथविधी सोहळा लवकरात लवकर उरकून घेण्याचे ठरवले. यापूर्वी जेव्हा अजित पवारांनी बंड केले होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब त्यांच्या विरोधात होते आणि एकाही सदस्याने त्यांना पाठिंबा दिला नव्हता. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली.
या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की,’इतर पक्ष काय म्हणतात हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असून आता आगामी निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर असेल. सुनेत्रा पवार यांचे शरद पवारांशी बोलणे झाले की नाही याची माहिती नसली तरी, काळाची गरज ओळखून पक्षाला सक्षम नेत्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. विभागीय जबाबदारीबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील आणि आजच नवीन नेत्याची निवड प्रक्रिया पूर्ण केली जाईल. पार्थ पवार यांनी शरद पवारांची भेट घेणे ही सकारात्मक बाब असून ते दादांच्या संकल्पनांबाबत त्यांच्याशी चर्चा करतील. विलीनीकरण किंवा एनडीएमध्ये सामील होण्याबाबतचे निर्णय भविष्यात घेतले जातील, मात्र सध्या तरी सुनेत्रा पवार यांनीच पक्षाची धुरा सांभाळावी असा आम्हा सर्वांचा आग्रह होता.