मनसे अध्यक्ष राज ठाकरे (फोटो- सोशल मीडिया)
सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
राज ठाकरेंची मार्मिक पोस्ट चर्चेत
राज्याला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
Raj Thakceray: आज सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे सर्वाधिकार देण्यात आले आहेत. शपथविधी पार पडल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट केली आहे. त्यांची पोस्ट चर्चेचा विषय ठरला आहे.
बारामती येथे विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यामुळे संपूर्ण राज्य शोकमय झाले. त्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेतृत्व आता अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली आहे. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची देखील शपथ घेतली आहे. यानंतर राज ठाकरे यांनी सोशल मिडियावर पोस्ट केली आहे.
राज ठाकरे यांची पोस्ट काय?
महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल.
महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी… — Raj Thackeray (@RajThackeray) January 31, 2026
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही !
राज्याला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या माजी खासदार सुनेत्रा पवार यांनी आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली आहे. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. राजभवन येथे आज त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे सर्वाधिकार असणार आहेत.
‘मी Sunetra Ajit Pawar शपथ घेते की..’; ऐतिहासिक क्षण! राज्याला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
मुंबईतील राजभवन येथे सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आजच्या शपथविधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे आमदार, वरिष्ठ नेते आणि मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित होते. आज दुपारी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी पक्षाच्या गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. पक्षाचे सर्वाधिकार सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आले आहेत.






