स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही एकत्रितपणे कसे सामोरे जाता येईल, यावर तिन्ही पक्षांचे प्रमुख एकत्रित बसून चर्चा करतील. या निवडणुकांमध्ये जिल्हा, तालुका स्तरावर, तसेच महानगरपालिका, नगरपालिका स्तरावर वेगवेगळी राजकीय परिस्थिती असते. त्यामुळे याचा विचार करता सर्वांना एकत्रितपणे घेऊन या निवडणुकांना कसे सामोरे जाता येईल, यादृष्टीने प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.